राजकीय घडामोडींना वेग : संभाजीराजेंना शिवसेना प्रवेशाची अट; तरच राज्यसभेचे तिकीट!

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण, याची उत्सुकता
Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav thackeray
Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav thackeray

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji raje) यांनी सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने (Shivsena) आपलाच सहावा उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Rajya sabha election 2022 election update))

संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास राज्यसभेची सहावी जागा दिली जाईल, अशी अट असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे यांच्याकडून अद्याप यास होकार आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे यांनी आपली उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच शिवसेनेने त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले होते. अद्याप ही ऑफर कायम आहे.

Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav thackeray
Sarkarnama Open Mic Challenge: इम्तियाज जलील खरंच आहे का भाजपची टीम बी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सहा जागा निवडून द्यायच्या आहेत. यात भाजपच्या दोन तर काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार पहिल्या मतांच्या कोटा घेऊन निवडून येऊ शकतात. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांचा प्रयत्न होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली होती. अपक्ष आमदारांनी आपल्याला सूचक आणि अनुमोदक म्हणून पुढे यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा दिल्याचा दावा त्यांच्या गोटातून करण्यात येत होता. आता मात्र तसे घडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांना कोण पाठिंबा देणार, याची उत्सुकता आहे. भाजपनेही आपली अतिरिक्त मते कोणाला देणार हे गुलदस्त्यात ठेवले आहे.

या निवडणुकीसाठी 42 मतांचा कोटा विजयासाठी ठरविण्यात आला आहे. भाजपचे दोन उमेदवार निवडून आल्यानंतर या पक्षाकडे अतिरिक्त 22 मते शिल्लक आहेत. याशिवाय अपक्षांची काही मते घेण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. अर्थात भाजपने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तर संभाजीराजे आणि पक्षातील नेत्यांचे यावर बोलणे झाले असल्याचे राजकीय वर्तुळात उघडपणे सांगण्यात येत आहे.

Maratha Reservation SambhajiRaje meeting with CM Uddhav thackeray
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

शिवसेनेची सहाव्या उमेदवाराची तयारी आहे. महाविकास आघाडीकडे तीसच्या आसपास पहिल्या कोट्यातील मते आहेत. त्यामुळे आपण भाजप म्हणेल त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी आपणच भाजपचा उमेदवार स्वपक्षात खेचून आणण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. संभाजीराजेंनी तो प्रस्ताव मान्य केला नाही तर सेना कोणाला रिंगणात उतरविणार, याची उत्सुकता आहे. काॅंग्रेसकडे दोनच अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे त्यांचा दुसरा उमेदवार रिंगणात नसेल. राष्ट्रवादीकडे 12 मते अतिरिक्त आहेत. तरीही राष्ट्रवादी काॅंग्रसने दुसऱ्या जागेवर हक्क सांगितलेला नाही. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप व्हाया संभाजीराजे असाच सामना या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. राष्ट्रवादीने यातून अलगद अंग काढून घेतले आहे, असे निरीक्षण काही सूत्रांनी नोंदविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com