Raj Thackeray Video : पराभव जिव्हारी, राज ठाकरेंकडून नेत्यांची झाडाझडती; आता दर आठवड्याला...

Raj Thackeray Meeting MNS Leaders : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल एका महिन्यानंतर राज ठाकरे यांनी बैठका घेत नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा मनसेचा सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले. 2012 च्या निवडणुकांमध्ये मनसे हा दुसऱ्या नंबरचा मोठा पक्ष ठरला होता.पालिकेत विरोधी पक्षनेत्या देखील मनसेचा होता. मात्र मनसेला यंदाच्या निवडणुकीमध्ये पुण्यात खातही उघडता आलेलं नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात नाशिक सोबतच पुण्यामध्ये मनसेचे संघटन हे भक्कम राहिले होते. पुण्यातून मनसेचे नगरसेवक सोबतच आमदारही निवडून गेले होते. मागील महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये मनसे सोडून ठाकरे सेनेत दाखल झालेले वसंत मोरे आणि मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर यांचा समावेश होता. यंदा या दोन्ही नेत्यांचा पराभव झाला आहे.

यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्रित निवडणूक लढली असताना देखील म्हणावे तितके यश निवडणुकीत मिळाले नाही. दोन्ही ठाकरे बंधून सोबत केलेल्या युतीचा फायदा पुण्यात काँग्रेसला जेवढा फायदा झाला तेवढा काँग्रेसचा मनसे आणि ठाकरे सेनेला झाला नसल्याचे समोर आला आहे. या सर्व विषयांबाबत राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत आत्मचिंतन बैठक केली.

महापालिकेच्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला निवडणुकीचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये पराभवाचा आत्मचिंतन करण्यात आले. बैठकीला शहरातील मनसे नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Raj Thackeray
Pune ZP President 2026: तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर-पाबळ गटाला ZP अध्यक्षपद मिळणार का? माजी सभापतींसह 14 सरपंच एकवटले

उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांनी पराभवाची कारणं जाणून घेतली. कुठे कुठे आपण कमी पडलो याबाबत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. राज ठाकरे यांनी सांगितलेल्या नियोजित गोष्टी पदाधिकाऱ्यांनी वेळेवर न केल्याने नाराजी ही व्यक्त केल्याचे सांगितलं जात आहे. तसेच आता इथून पुढे दर आठवड्याला आपण बैठका घेऊन आढावा घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Raj Thackeray
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, आज आमदाराची महत्त्वाची बैठक, विलीनीकरण, झिरवळ प्रकरणावर निर्णय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com