Rashmi Shukla Phone Tapping : 'फोन टॅपिंग' प्रकरणाला कायमचा पूर्णविराम ; रश्मी शुक्लांना मोठा दिलासा...

Rashmi Shukla News Update : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Phone tapping case News
Phone tapping case News Sarkarnama

Mumbai News : भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन केली होती. आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. 'फोन टॅपिंग' मध्ये वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी रश्मी शुक्लांना मोठा दिलासा न्यायालयाने दिला आहे. (Rashmi Shukla Latest News)

याबाबत सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने ‘फोन टॅपिंग’प्रकरण कायमचे बंद झाले आहे. या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Phone tapping case News
Pradeep Sharma Grants Bail : अँटिलिया स्फोटके प्रकरण : प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवाल वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली होती.

Phone tapping case News
Central Government News : सीबीआय अन् ईडीच्या समन्वयासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल ; CIO च्या प्रमुखपदी संजय मिश्रा...

महाविकास आघाडी सरकारमधील या नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याच्या आरोप रश्‍मी शुक्ला यांच्यावर आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ठपका ठेवल्यानंतरच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये दिल्यानंतर शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com