Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अजितदादांची स्तुती; शरद पवारांसोबत राहूनही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही!

Ajit Pawar : विकासाचा मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी विरोधकांकडून धार्मिक मुद्दे उकरून जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो.
Raj Thackeray, Ajit Pawar
Raj Thackeray, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची Ajit Pawar जाहीरपणे स्तुती केली. शरद पवारांसोबत राहुनही अजित पवारांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. वेगवेगळ्या प्रकरणातून पुणे आणि राज्यात जातीपातीचे विष विरोधकांकडून पसरवण्यात आल्याचा घणाघातही राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरे म्हणाले, काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांचा विदेशी मुद्दा काढून शरद पवार Sharad Pawar बाहेर पडले. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेपासून अजित पवार हे शरद पवारांसोबत काम करत आहेत. असे असतानाही अजितदादांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. ते कायम सर्व समाजाला सोबत घेऊनच विकास कामे आणि राजकारण करत आले आहेत.

राज्यातील अनेक शहरे अस्ताव्यस्तपणे वाढत आहेत. त्यावरून लक्ष दूर करण्यासाठी विरोधक वेगळेच मुद्दे काढत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी Raj Thackeray केला. ते म्हणाले, विकासाच्या दृष्टीने वाढत असलेल्या शहराकडे कुणाचेही लक्ष नाही. याकडे दुर्लक्ष होण्यासाठी नेते लोकांना जातीपातीत गुंतवून ठेवत आहेत. यातून बाहेर या, आणि आपल्या लोकप्रतिनिधींना शहराच्या विकासाबाबत प्रश्न विचारा, असेही आवाहन ठाकरेंनी केले.

Raj Thackeray, Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

राज्यात 1999 पासून जातीचे विष पसरावयला सुरू झाले. पुण्याती राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला. जेम्स लेन यांच्या माध्यमातूनही जातीचे विष पसरवले. आता मशि‍दीतून काँग्रेसला, ठाकरे गटाला मतदान करण्याचे फतवे काढले जातात. आता मीही फतवा काढतो, की राज्यात महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा, त्यांना निवडून आणा, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले.

Raj Thackeray, Ajit Pawar
Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंमुळे शिंदेंसेनेचा गोविंदा हॉटेलबाहेर 20 मिनिटं वेटींगवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com