Raju Shetti : फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेऊ, शेट्टींनी विधानसभेचा शड्डू बारामतीतून ठोकला; किती जागा लढणार?

Raju Shetti News : संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल माफी करावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक जुलैपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
Raju Shetti
Raju Shettisarkarnama
Published on
Updated on

दोनआगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बारामतीतून रणशिंग फुंकलं आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना 30 ते 35 जागा लढणार, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी केली.

आम्ही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, असा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ( Swabhimani Shetkari Sanghatna ) दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीची सांगता रविवारी 23 जूनला झाली. तेव्हा शड्डू ठोकत राजू शेट्टी विधानसभेच्या मैदानात उतरत असल्याचं जाहीर केलं.

राजू शेट्टी म्हणाले, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एकूण 14 ठराव पारित केले आहेत. त्या ठरावांचा सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. सरकारनं या मागण्या मान्य केल्या, तर आम्ही सरकारबरोबर राहू. अन्यथा आम्ही 'एकला चलो रे'ची भूमिका पार पाडू."

Raju Shetti
Raju Shetti : पराभवाने खचून घरी बसतील ते राजू शेट्टी कसले? बळिराजाच्या कर्जमुक्तीसाठी उतरले मैदानात!

"पराभवानं खचणारा मी माणूस नाही. शेतकरी चळवळ हा माझा आत्मा आहे. मी कष्टकऱ्यांमागे सावलीप्रमाणे असून त्यांच्या न्याय प्रश्नासाठी सदैव लढत राहीन. निवडणूक लढविणे हे माझे साध्य नाही. आम्ही 'फिनिक्स' पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ. आमचे काय चुकलं यावर मंथन करून पुढील दिशा ठरवू," असं शेट्टींनी सांगितलं.

Raju Shetti
Raju Shetty : मजूर मुलांच्या लग्नासाठी उपाययोजना करा; मुलीला 5 लाख द्या, 'स्वाभिमानी'ची सरकारकडे मागणी

"शेतकऱ्यांचे प्रश्न अजून मिटलेले नाहीत. राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे हा पिचलेला मार्ग आहे. दिवसा विजेची मागणी आम्ही कित्येक दिवसांपासून करत आहोत. तरी देखील सरकार द्यायला तयार नाही. धरणे आमची, जमिनी आमच्या, पाणी देखील आमचेच, मग शेतीला वीज द्यायला हाताला लकवा मारलाय का?" असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com