Pune Political News : कोथरुडमधून 2019 ला भाजपने विधानसभेची उमेदवारी डावलल्यानंतर माजी आमदार मेधा कुलकर्णी नेहमीच चर्चेत राहिल्या. मात्र आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आगामी पुणे लोकसभेची समीकरणे बदलली आहेत. तसेच ही उमेदवारी जाहीर करतानाच पक्षाने पदाधिकारी आणि इच्छुकांना कडक इशाराच दिल्याचे समजते आहे. यामुळे भाजपमधील इच्छुकांचे धाबे दणाणले असून आगामी काळात आपल्याला पक्षांतर्गत कुरघोडीला आळा घालून, कार्यपद्धतीत बदल करावा लागणार असल्याचा संदेश पदाधिकाऱ्यापर्यंत गेला. (Latest Marathi News)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय बैठक नोव्हेंबर महिन्यात पार पडली होती. या बैठकीत मुख्य मुद्दा महिला सबलीकरण हा होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पंधरादिवसांपूर्वी अर्थसंकल्प मांडताना महिलांच्या सशक्तीकरणावर भर देणार असल्याचे सांगितले. मोदी सरकारच्या या अर्थसकल्पामध्ये गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या घटकांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचा हा अजेंडा पाहता राज्यसभेवर राज्यातून त्यांनी सहा जागांपैकी एका जागेवर महिला उमेदवार पाहिजे, असा विचार पक्षाचा होता. भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून सुरुवातीपासून सक्रिय असलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींना उमेदवारी देण्यात आले. यामध्ये मागील काही निवडणुकीत भाजपकडून ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधित्वाला डावलले गेले, असा सूर आवळला जात होता. अखेर कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपला आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रभावी चेहरा मिळाला आहे.
कुलकर्णी यांची दोन नगरसेवकपदाचे कार्यकाळ आणि एक वेळ आमदारकीची कारकिर्द फार संघर्षमय होता. स्वपक्षातूनही त्यांना अनेकदा आव्हानं निर्माण झाली. २०१९ च्या निवडणुकीत तर त्यांच्या उमेदवारीला कात्री लावून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर कोथरूडमधील भाजपमधील अस्वस्थता आणि नाराजीचे सूर सर्वत्र चर्चा कायम होत राहिली. शहर भाजपमधूनही त्यांना डावलण्याचा प्रयत्न होतच राहिला.
यानंतर त्यांची व्यक्त-अव्यक्त नाराजी काही अंशी दूर करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कुलकर्णींची निवड करण्यात आली. ही संधी साधत त्या पक्षात अधिकच सक्रिय झाल्या. पक्षाच्या राष्ट्रीय प्रवाहात सक्रिय झाल्यानंतरही त्यांनी पुण्यातल्या मतदारांशी कायमच सपर्क ठेवला. मतदारसंघात कायमच त्यांनी मतदारांशी संवाद कायम ठेवला. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांकडून डावलल्या गेल्यानंतरही त्यांनी आपला संघर्ष कायम ठेवला. अशावेळी राज्य आणि केंद्रीय नेत्यांशी संपर्क त्यांनी वाढवत नेला. त्यामुळे आमदारकीला डावलले गेल्यानंतरही त्यांची राज्यसभेवर खासदारकीसाठी वर्णी लागली.
कोणत्याही राजकीय वा सामाजिक संघटनेत गट तट असतात, तसे भाजपमध्ये अंतर्गत गट आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, मूळ भाजप पक्ष आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेही उपगट आहेत. त्यांच्यात वेळोवेळी अंतर्गत संघर्षही सुरु असतात. भाजपचे पुणे शहरात पाच आमदार आहे, मात्र त्यांच्या पक्षीय संघटनेत तितकसा प्रभाव दिसून येत नाही.
मेधा कुलकर्णी यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी मिळेपर्यंत, त्यांनी उमेदवारी बहाल होऊ शकते. याची कुणालाही कल्पनाही नव्हती. यामुळे आता भाजप शहरस्तरावर पक्षाला एक नेतृत्वही मिळाले आहे. या उमेदवारीमुळे लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांचे समीकरण आता बदलले आहे. कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपच्या वरिष्ठांनी इच्छुकांना स्पष्ट संदेशच दिले आहे. अंतर्गच संघर्ष टाळावे, गटबाजी उफाळू नये, याची दक्षता घ्या, असा स्पष्ट संदेश यातून गेला.
मेधा कुलकर्णींना पक्षाबसोबतच बाहेरील संपर्क त्यांनी पुढच्या वाटचालीत उपयोगी ठरणार नाही. दोन वेळा नगरसेवक. एक टर्म आमदार, पक्ष संघटनेतील काम याचा त्यांना अनुभव आहे. गिरीश बापट यांच्यासारखंच त्यांनी तिन्ही सभागृहात पोहचल्या आहेत. यामुळे आता राष्ट्रीय राजकारणात ठळक कामगिरी करण्याची त्यांना संधी आहे. त्याचसोबत कोथरुड आणि पुण्याच्या प्रश्नांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना राजकीय शक्ती मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.