Ghodganga Sakhar Karkhana : 'घोडगंगा'च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरसावले कामगार; घेतला मोठा निर्णय !

Raosaheb Pawar Ghodganga Sugar Factory : कामगारांनी शेतकऱ्यांविरोधात कुठलीही भूमिका घेतली नाही
Ghodganga Sugar Factory employee agitation
Ghodganga Sugar Factory employee agitationSarakarnama

Pune News : पुण्यातील शिरूरमधील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वर्षभरापासून पगार रखडल्याने आंदोलन सुरू आहे. अशातच कारखान्याला सभासद शेतकऱ्यांची 'एफआरपी' आणि ऊसतोडणी वाहतूकदारांचे पैसे रखडवल्याने साखर आयुक्तालयाने नोटीस बजावून जप्तीचे आदेश दिले आहेत. मात्र कारखाना व्यवस्थापनाने याचे खापर कामगारांवर फोडत असल्याने आंदोलक आक्रमक झालेत आहेत. कारखान्याच्या आरोपानंतर आंदोलकांनी शेतकरी आणि ऊसतोडीणी वाहतूकदारांचे रखडलेल्या रकमेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २५ कामगारांना काम करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Political News)

जून २०२२ पासूनचा पगार आणि इतर मागण्यांसाठी घोडगंगा साखर कारखान्यातील कामगारांनी १ जुलैपासून आंदोलन सुरू केले आहे. कामगारांनी असहकार केल्याने कारखान्याला कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा वेळेत पुरवठा झाला नसल्याचा आरोप कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आला. दरम्यान, शेतकरी सभासदांची 'एफआरपी', ऊसतोडणी वाहतूकदारांची रक्कम देण्यात कामगार आडवे येत असल्याचा आरोप कारखान्याकडून होत असल्याचा माहिती कामगार नेते महादेव मचाले यांनी दिली. "कारखान्याचे हे आरोप बिनबुडाचे असून शेतकऱ्यांमुळेच हा कारखाना आणि आमचे पोट चालते. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांविरोधी कधीही भूमिका घेतलेली नाही", असे मचालेंनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

Ghodganga Sugar Factory employee agitation
Ghodganga Sakhar Karkhana: ५० टक्के पगार करा, अन्यथा...; 'घोडगंगा'च्या कामगारांचा इशारा

कामगार पगार आणि इतर हक्काच्या मागण्यांसाठी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. यात नोटीस आल्याने कारखान्याकडून शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप महादेव मचालेंनी केला. "आंदोलन सुरू असतानाही शेतकरी आणि ऊसतोडणी वाहतूकदारांचे पैसे देण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २५ कामगार काम करतील. कारखान्याने शेतकऱ्यांचे उद्याच पैसे दिले तरी आमचे काही म्हणणे नाही. आधी शेतकरी सभासदांची देणी पूर्ण करावीत. त्यानंतर आमच्या मागण्याही पूर्ण कराव्यात, अशीच आमची पहिल्यापासून भूमिका आहे," असा दावा करून मचालेंनी "कारखाना व्यवस्थापनाकडून कामगारांबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असल्याने आम्ही व्यथित झालो आहोत", असेही सांगितले.

Ghodganga Sugar Factory employee agitation
Ghodganga Sakhar Karkhana : चर्चेला तयार पण मागण्यांवर ठाम; आंदोलनाच्या ५१ व्या दिवशीही कामगारांची भूमिका कायम

शेतकऱ्यांची १५ कोटी ७६ लाख ५९ हजार 'एफआरपी' थकवल्याने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी घोडगंगा कारखान्याला महसूल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीची नोटीस बजावली आहे. असे असले तरी कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदर अशोक पवारांनी कामगारांच्या कष्टाचा एकही पैसा बुडणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. आता कामगारांच्या आंदोलनाला ५४ दिवस पूर्ण झाले असून अद्यापही कुठलाही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आम्ही चर्चेला तयार असलो तरी रखडलेल्या एकूण पगारातील ५० टक्के रक्कम मिळावी, या मागणीवर ठाम असल्याचेही कामगारांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. कामगारांबाबत कारखाना व्यवस्थापनाला योग्य तोडगा काढता येत नसल्याने या आंदोलनाच्या पुढील दिशेकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com