जानकरांनी वाढविले भरणेंचे टेन्शन : राष्ट्रवादीचे प्रवीण माने इंदापूरमध्ये रासपचे उमेदवार?

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील उमेदवार असतील, ही शक्यता गृहीत धरुन, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रवीण माने यांना रासपकडून संधी दिली जाऊ शकते.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

कळस (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यात माजी मंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या वादात प्रवीण माने हे आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) आमदार होऊ शकतात, असे भाकित पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी तालुक्यातील रुई येथे व्यक्त केले. जानकर यांनी हे भाकित करून माजी मंत्री भरणे यांचे टेन्शन वाढविले आहे. तसेच, त्यांच्या या विधानामुळे राजकीय जाणकारांसह इंदापूरमधील मतदारांच्या भूवयाही उंचावल्या आहेत. (Rashtriya Samaj Party Candidate in Praveen Mane Indapur : Mahadev Jankar)

जिल्हा परिषद सभापती राहिलेले प्रवीण माने यांची गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमाला असलेली गैरहजेरी ठळकपणे जानवणारी आहे. याशिवाय राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत आमदार भरणे यांनी जाहीर भाषणात वक्तव्य केले होते. त्यानंतर जानकर यांनी माने यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर प्रवीण माने हे रासपची वाट धरणार काय? याबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Mahadev Jankar
PCMC : पवारांनी आणलेल्या पालिका आयुक्तांच्या आदेशाला शिंदे सरकारच्या आयुक्तांकडून केराची टोपली

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील रुई येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात खुद्द जानकर यांनीच भाष्य केल्याने विद्यमान आमदार भरणे यांच्या अडचणी वाढू शकतात. या कार्यक्रमास रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, तालुकाध्यक्ष तानाजी मारकड उपस्थित होते.

Mahadev Jankar
Parambir Singh : परमबीर सिंह यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; रात्री उशिरा खलबतं !

आमदार जानकर म्हणाले की, आमचे लक्ष्य राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ आणि २८८ विधानसभा मतदारसंघावर आहे. या सर्व ठिकाणी आम्ही तुल्यबळ उमेदवार देणार आहोत. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील उमेदवार असतील, ही शक्यता गृहीत धरुन, राष्ट्रवादीचे युवा नेते प्रवीण माने यांना रासपकडून संधी दिली जाऊ शकते. भरणे आणि पाटील वादात माने हे आमदार होऊ शकतात. रासपची देशात ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. पक्षाला लागलेला जातीचा शिक्का खोडून काढणे महत्वाचे आहे.

Mahadev Jankar
न्यायलयीन लढाईनंतर अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर: आजच भरणार उमेदवारी अर्ज

दरम्यान बाबीर देवस्थान येथे प्रवीण माने यांनी केलेल्या विकासकामाचे कौतुक करत, जानकरांनी त्यांचे महत्त्व अधोरेखित करत आभार मानले. याशिवाय मंदिराच्या बांधकामाला आमदार दत्तात्रेय भरणे यांनी निधी उपलब्ध केल्यामुळे त्यांचेही जाहीर आभार मानले. मात्र, जानकर यांच्या या वक्तव्यामुळे तालुक्यात राजकीय खळबळ उडाली आहे. भरणे व पाटील यांच्यात गेली तीन पंचवार्षिकला लढत होत आहे. या पारंपरिक लढतीत जानकर यांच्या दाव्यामुळे माने यांचे नाव चर्चेत आले आहे.

प्रवीण माने हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती असून सोनाई उद्योग समूहाचे संचालक आहेत. तसेच, माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी २०१९ मध्ये उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यावेळी माने यांनी पुढील निवडणुकीत उमेदवार राहणार असल्याचे जाहीर केले होते, त्यामुळे जानकर यांनी माने यांना जाहीर निमंत्रण दिल्याने तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com