न्यायलयीन लढाईनंतर अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर: आजच भरणार उमेदवारी अर्ज

Rutuja Latke आता शिवसेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल हा सामना पाहायला मिळणार आहे.
Rutuja Latke
Rutuja Latke
Published on
Updated on

Rutuja Latke Andheri Election मुंबई : महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यांच्या राजीनामा मंजूरीचं पत्र महापालिकेने तयार केलं असून त्या महापालिकेत पोहचल्या आहे. राजीनाम्याचं पत्र हाती आल्यानंतर काही वेळातचं त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील, असंही सांगण्यात आलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही गटाकडून मोठ शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नव्हता. त्यामुळे लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. याविरोधात लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायमुर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ऋतुजा लटके यांच्यातर्फे अ‌ॅड.विश्वजित सावंत तर, मुंबई पालिकेतर्फे अ‌ॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली.

Rutuja Latke
Andheri By Election : ठाकरेंच्या उमेदवार ऋतुजा लटके शिंदे गटाच्या गळाला ?

महानगरपालिकेला आपल्या सेवेचा राजीनामा त्वरीत मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांनी मागणी केली होती. आता मात्र या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई पालिकेला खडसावले. पालिकेकडे विशेषाधिकार आहेत, असे असतानाही अशी प्रकरणं न्यायालयात येता कामा नये, असे पालिकेला बजावले. तसेच, "उद्या (शनिवारी) सकाळी अकरा वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा मंजूर करा," असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला.

न्यायालयीन लढाई लढल्यानंतर अखेर महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राजीनामा मंजूरीचे पत्र हाती येताच ऋतुजा लटके शिवसेनेच्या बाजूने आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर भाजपच्या बाजून मुरजी पटेल त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील. तर भाजप कडूनही या जागेसाठी मुरजी पटेल यांचे नाव समोर आले होते. पण आता शिवसेनेच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल हा सामना पाहायला मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com