Sarkarnama Special : दामदुप्पट रकमेच्या अमिषाने कोट्यवधींचा घोटाळा? पुण्यात ‘विशाल फटे’सारखे प्रकरण; गुंतवणूकदार हवालदिल

Pune Crime News : घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यता
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama

Fraud in Pune : महिन्याला पाच टक्के मूळ परतावा व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा देण्याचा बहाणा करणाऱ्या एका कंपनीच्या फसवणुकीला पुण्यातील तसेच राज्यातील हजारो लोक बळी पडले आहेत. परतावा घेण्यासाठी बाणेर रस्त्यावरील या कंपनीच्या कार्यालयात आज लोक गेल्यानंतर कंपनीचे कार्यालय कुलूपबंद असल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Pune Crime News
Jayant Patil On Ayodhya News : देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय..

फसवणुकीचा (Fraud in Pune) हा आकडा मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत येत आहे. सुमारे पाचशे ते हजार कोटी रूपयांचा हा अर्थिक घोटाळा असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कंपनीच्या कार्यालयाबाहेर आज सुमारे पन्नास-साठ गुंतवणूकदार पोचले. मात्र, कार्यालय कुलूपबंद असल्याचे लक्षात आल्यानंतर साऱ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली. या संदर्भात अद्याप पोलिसांकडे (Pune Police) कुणीही तक्रार दिली नसली तरी गुंतरवणूकदारांच्या माहितीनुसार या घोटाळ्याचा आकडा मोठा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Pune Crime News
IT Notice to Abu Azmi : अबू आझमींकडून 160 कोटींची करचुकवेगिरीचा आरोप; 20 एप्रिलला चौकशीला बोलवलं

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करण्यात आली. या कंपनीकडे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये पुण्यातील अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. गुंतवणूक केल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यापासून मूळ गुंतवलेल्या रकमेपैकी पाच टक्के तर व्याज पाच टक्के असे दरमहा दहा टक्का परतावा देण्याचे कंपनीकडून मान्य करण्यात आल्याने अनेकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा आकडादेखील मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Pune Crime News
Kapil Sibal News : सिब्बल ठाकरेंसाठी पुन्हा मैदानात; शिंदेंवर थेट हल्लाबोल : षडयंत्र रचणारे संधीसाधू...

या संदर्भात अद्याप कुणीही पोलिसांकडे गेलेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे घालणाऱ्या लोकांनी सांगितलेले आकडे मोठे असून याची व्याप्ती मोठी असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

वर्षभरापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे विशाल फटे या युवकाने अशाच प्रकारे गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली होती.त्याचीच पुनरावृत्ती होते की काय अशी भीती या प्रकरणामुळे व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com