Kasaba By Election : कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. कोणत्याही क्षणी त्यांचे नाव जाहीर होईल, असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. 'कसब्यातून रासने आणि धंगेकर याच्यात लढत होईल,' असे वृत्त 'सरकारनामा'ने ३१ जानेवारी रोजी दिले होते. ते खरे ठरले.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण त्याला विरोधी पक्षांना प्रतिसाद दिला नाही. फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली होती. शनिवारी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसकडून धंगेकर रिंगणात उतरल्याने कसब्याची ही निवडणूक अधिक रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
तर चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे.चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत रविंद्र धंगेकर..
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र धंगेकर यांची ओळख होती. मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक पदावर कामे केली आहेत.
जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे.
कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे.
विधानसभा निवडणूकांमध्ये धंगेकर यांनी बापटांसमोर क़डवे आव्हान उभे केले होते.
धंगेकर यांनी २००९ साली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची राज्यात लाट असताना देखील धंगेकर यांनी आव्हान दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.