
Rupali Thombre Social Media Post : काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार आणि महत्त्वाचे नेते रवींद्र धंगेकर हे कायमच चर्चेत असतात, कधी ते त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे. मात्र सध्या मागील काही दिवसांपासून ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत.
कारण, एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत आता धंगेकर हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत. तर या चर्चा सुरू असतानाच आता धंगेकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही दारं खुली झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील नेत्या रूपाली ठोंबरे यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.
''आमदार रवी भाऊ आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा(NCP) पण विचार करू शकता की. रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी. निवडणुकीत हार जीत चालतच असते. नेतृत्व,कामाची पद्धत थांबत नसते.''
''भाऊ तुझ्या सोबत काम केले आहेच. काही दिवस बातमी येत आहे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात, कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ अजितदादांचे(Ajit Pawar) आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहे ते तू अनुभवले आहेत.''
''तुझ्यासारखे काम करणारा, सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाचा कार्यकर्ता, लोकप्रनिधिनी नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती असेल. बाकी पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते, काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहीण भाऊ नाते कायम आहेच.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.