Sanjay Raut: ठाकरेंना अडवून दाखवा; राऊतांनी पोलिसांसमोर दंड थोपटले, मुंब्रा येथे तणाव...

Thackeray Visit to Mumbra: 31 तारखेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार नाहीत
Eknath Shinde, Sanjay Raut
Eknath Shinde, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai: उद्धव ठाकरे आज दुपारी मुंब्रा येथे शिवसेना शाखेला भेट देणार आहे. यावरून परिसरात तणाव निर्माण झाला आहे. शिंदे गट ठाकरेंना विरोध करण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलिसांवर आरोप करीत त्यांना आव्हान केलं आहे. "पोलिस आयुक्तांना आव्हान करतो, आम्ही येत आहोत, तुम्ही आम्हाला अडवून दाखवा," असे सांगत राऊतांनी दंड थोपटले आहे.

उद्धव ठाकरे यांना येण्यापासून पोलिस रोखत आहेत. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांना तडीपार करण्याची धमकी दिली आहे. पोलिसांसमोर ठाकरेंचे बॅनर फाडले आहेत. जे आता आम्हाला अडवत आहेत, ते ज्यावेळी शाखा तोडत होते, तेव्हा कुठे होते, असा सवाल राऊतांनी पोलिसांना केला आहे. "जे पोलिस शिंदे सरकारची चाकरी करीत आहेत, त्यांना एवढंच सांगतो, की 31 तारखेनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार नाहीत," असे राऊतांनी ठामपणे सांगितले.

Eknath Shinde, Sanjay Raut
MNS: मनसे-भाजपमध्ये आतषबाजी सुरू; शेलार-देशपांडेंमध्ये जुंपली...मराठी पंतप्रधान करून दाखवा!

जितेंद्र आव्हाडांनी पैसे वाटले?

मुंब्रा येथील शाखा आमची आहे. त्याचा गैरवापर सुरू होता म्हणून आम्ही तोडून ही शाखा नवीन बांधत आहोत. आमच्या शाखेत जर उद्धव ठाकरे येणार असतील, तर आम्ही त्यांना विरोध करणार, असा इशारा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी दिला आहे. "उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी माणसं जमा करायला जितेंद्र आव्हाडांनी पैसे वाटले आहेत. ही शाखा आमची आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घेतलेली आहे," असे म्हस्के म्हणाले.

ठाकरेंच्या दौऱ्याचे लावलेले मुंब्रा येथील बॅनर फाडण्यात आले आहे. याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट केला आहे. आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे हे आज मुंब्रा येथे येणार असल्याने परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एसआरपीच्या तुकड्या तैनात ...

मुंब्रा येथील शिवसेनेचा शाखेतील वादानंतर आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीस देण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजन किणे यांना मुंब्रा पोलिसांकडून 149 ची नोटीस देण्यात आली आहे. शिंदे गटाच्या 10, तर ठाकरे गटाचे 5 कार्यकर्त्यां नोटीस बजावली आहे. काल (शुक्रवारी) रात्री पोलिसांनी परिसराचा आढावा घेतला आहे. परिस्थिती पाहून या ठिकाणी एसआरपीच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहे.

Eknath Shinde, Sanjay Raut
Karjat Jamkhed News: आमदारांमुळे कर्जत-जामखेडमध्ये मतदारांना डबल धमाका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com