Video Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात दोघांना अटक, आमदार धंगेकरांच्या आरोपानंतर पोलिसांना जाग!

Ravindra Dhangekar Pune Police : पुणे पोलिसांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका हॉटेलमध्ये मोठी कारवाई केली आहे. या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन मुले ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Drug News
Drug News Sarkarnama

Pune Crime News : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका मोठ्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केला होता. त्यानुसार कारवाई करत पुणे पोलिसांनी दोन जणांना तब्यात घेतले आहे. शैक्षणिक हब अशी ओळख असलेल्या पुण्याला ड्रग्जने विळखा घातल्याची टीका होऊ लागली आहे.

या संदर्भात'साम' टीव्हीने वृत्त दिले आहे. पुणे पोलिसांनी फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका हॉटेलमध्ये मोठी कारवाई केली आहे. या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन मुले सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकारानंतर आमदार रवींद्र धंगेकरांनी राज्य सरकारसह पुणे पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.

धंगेकर काय म्हणाले?

भाजपचे BJPआमदार यांचं कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या बाहेर, असं व्यवहार चालत आहेत. यामध्ये प्रशासनाचा हस्तक्षेप आहे. गुन्हेगार प्रवृत्तीची लोक हे हॉटेल चालवतात. याच गुन्हेगारांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात. हे गुन्हेगार कुठल्याही परिस्थिती घाबरत नाही. हाच पैसा राजकारणात वापरला जातो. भाजप आणि शंभूराज देसाई यांचा यामध्ये दोष आहे. पुणे हे विद्येचं माहेर आहे. याला काळीमा फासण्याचं काम पुणे शहर पोलिसांच्या वतीनं होत आहे. हे ताबडतोब थांबवलं पाहिजे. काही बार अजूनही चालू आहे. पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय चालत नाही.

Drug News
Shrikant Shinde : 'वरळी सोडून दुसरा मतदारसंघ शोधतात...', श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

देसाई नाही कसाई

चौकात एखादी हातगाडी लावली तर पोलिस काढून टाकतात. हुक्का पार्लर आणि हॉटेलमध्ये अंमली पदार्थ करते काय? पाकिट बंद झालं पाहिजे. पाकिटामुळे पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम पुणे पोलिस करत आहेत. पुण्याचा उडता पंजाब झाला आहे. हा अंमली पदार्थ येतो कोठून कोणाचा हस्तक्षेप आहे? कोण याला मदत करते, याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. चरणसिंह रजपूत यांचा हफ्ता शंभूराज देसाई यांच्या घरापर्यंत पोहोचतो. अजूनही देसाई रजपूत यांना पाठिशी घालत असतील तर, ते देसाई नाही तर कसाई म्हणण्याची वेळ आली आहे, असे देखील रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.

Drug News
Raju Shetty : मजूर मुलांच्या लग्नासाठी उपाययोजना करा; मुलीला 5 लाख द्या, 'स्वाभिमानी'ची सरकारकडे मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com