Shrikant Shinde on Aditya Thackeray
Shrikant Shinde on Aditya ThackeraySarkarnama

Shrikant Shinde : 'वरळी सोडून दुसरा मतदारसंघ शोधतात...', श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Shrikant Shinde Vs Aditya Thackeray: महाविकास आघाडीने दिशाभूल केली त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र कामयस्वरुपी या गोष्टी नसतात, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Shrikant Shinde News : वरळीत चिखल असला तरी येथे कमळ येवून देणार नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता. त्यावर लोकसभेला वरळीतून अवघ्या 6 हजाराचे लीड दिले. त्यामुळे वरळीत पुन्हा निवडणुकीला उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पाहा?, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

वरळीतून 40 हजाराचे लीड देण्याचे बोलले जात होते. अवघे सहा हजारांचे लीड दिले. त्यांना वाटत होते मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे. खऱ्या अर्थाने मराठी माणूस शिवसेना शिंदे गटाच्या बाजुने आहे, असे देखील श्रीकांत शिंदे म्हणाले.

महाविकास आघाडीने दिशाभूल केली त्यामुळे त्यांचा विजय झाला. मात्र कामयस्वरुपी या गोष्टी नसतात. लोकांची दिशाभूल एकदा करता येते. वारंवार दिशाभूल करता येत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास देखील श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी व्यक्त केला.

Shrikant Shinde on Aditya Thackeray
Ramdas Kadam : रामदास कदमांना कोणत्या गोष्टीचे दुःख आजही सलते; शिंदेंच्या कोणत्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी!

मनसे वरळीत उमेदवार देणार

2019 मध्ये आदित्य ठाकरे हे वरळीतून उमेदवार असताना मनसेने MNS पाठींबा दिला होता. मात्र, यंदा वरळी विधानसभा लढण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. मनसेकडून संदीप देशपांडे निवडणूक लढतील, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com