प्रियांका गांधींच्या अटकेचे पिंपरीत पडसाद...

इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, इंटक, युवक काँग्रेस, सेवादल व एनएसयुआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. 
Congress Andolan
Congress Andolan Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : केंद्रीय गृहराज्यमंत्री (Central Minister Of State)अजय मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांचा मुलगा अभिषेक यांच्या ताफ्यातील दोन मोटारी उत्तरप्रदेशातील (लखीमपूर खिरी) येथील शेतकरी आंदोलनात काल (ता.३ ऑक्टोबर) घुसल्याने आठजणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभर जनक्षोभ उसळला आहे. त्याचे पडसाद आज (ता.४ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad)उमटले. या घटनेत बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेटायला निघालेल्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला कॉंग्रेसने जोडे मारत आंदोलन केले व मुख्यंमत्री योगीं यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

Congress Andolan
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार मुंदडांचे एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कामगार नेते व इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, इंटक, युवक काँग्रेस, सेवादल व एनएसयुआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी उत्तर प्रदेश व केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, शहराध्यक्ष डॉ. वसीम ईनामदार, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, उत्तरप्रदेश काँग्रेस सेवादलाचे महासचिव सलमान जब्बारअली, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Congress Andolan
वाकडमध्ये पुन्हा झळकले फ्लेक्स : होय, मी रस्ता बोलतोय !

यावेळी डॉ. कदम म्हणाले की, "केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सर्वसामान्य व विशेषतः शेतकरी व कामगारांवर अन्याय केला जात आहे. लखीमपूरच्या घटनेतून देशात हुकूमशाही राजवट आणण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. त्यातून मोदी व योगी सरकार तसेच भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रियांका गांधी यांना बेकायदेशीर अटक करणे हे खेदजनक व संतापजनक आहे. त्यातून योगी सरकार हे प्रियांका गांधी यांना घाबरत असल्याचे दिसून येते," असे ते म्हणाले. तर, प्रियांका गांधींना अवैधपणे अडवून उत्तरप्रदेश पोलिसांनी स्वतः कायद्याचा भंग केला आहे. यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात. आता जनताच या हुकूमशाहीचे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बनसोडे यांनी दिला. यावेळी बळी पडलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com