‘एमपीएससी’चा सुधारीत निकाल जाहीर : मानसी पाटील मुलींमध्ये राज्यात पहिल्या

विशेष अर्थिक मागास (एसईबीसी) प्रवर्गातील उमेदवारांची निवड सर्वोच्च रद्द केल्यानंतर या प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या गटात सामावून घेऊन अंतीम निकाल आज जाहीर करण्यात आले.
MPSC
MPSCSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (MPSC) घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा सुधारीत निकाल आज जाहीर करण्यात आला. या निकालानुसार राज्यातून मुलींमध्ये मानसी पाटील (Mansi Patil) या राज्यात पहिल्या आल्या आहेत.यामुळे जून २०२० मध्ये जाहीर झालेल्या मूळ निकालास आज अंतीम रूप मिळाले आहे.विशेष अर्थिक मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांची निवड सर्वोच्च रद्द केल्यानंतर या प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या गटात सामावून घेऊन अंतीम निकाल आज जाहीर करण्यात आले.(Revised results of MPSC announced: Mansi Patil first in the state among girls)

खुल्या गटात समावेश करून निकाल जाहीर केल्यानंतर पर्वणी पाटील यांच्याऐवजी आता मुलींमध्ये मानसी पाटील या राज्यात पहिल्या आल्या आहेत.आधीच्या परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्या उमेदवारांना या निवड प्रक्रियेतून बाहेर पडण्याचे आवाहन (ऑप्टिींग पोस्ट) लोकसेवा आयोगाने केले होते. त्यानुसार पर्वणी पाटील यांची आधीच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यामुळे आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या या प्रक्रियेतून बाहेर पडल्याने मानसी पाटील यांना मुलींमध्ये राज्यात पहिल्या घोषित करण्यात आले.

MPSC
शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ओतले सोयाबीन

आधीच्या प्रक्रियेत विविध पदांवर निवड झालेल्या सुमारे १५-२० जण नव्या निवड प्रक्रियेतून बाहेर पडले. निवड झाली असली तरी आधीच आपल्याकडे पद असल्याने नव्या निवड प्रक्रियेतून आपण बाहेर पडत असल्याचे १५-२० उमेदवारांनी आयोगाला कळविले. त्यामुळे त्या जागांवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळाली आहे.

MPSC
महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत

सुधारीत निकाल जाही झाला असला तरी जून २०२० मध्ये खुल्या गटातून राज्यात प्रथम आलेले प्रसाद बसवेश्‍वर चौगुले हेच राज्यात पहिले आले आहेत.मागास प्रवर्गातून रोहन रघुनाथ कुवर हेच पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.मुलींमधून पर्वणी पाटील यांच्याऐवजी मानसी पाटील यांचा प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. एकुण ४२० पदांचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com