Pune Crime News : पोलिस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

Pune Police News : रोहिदास जाधव या तरुणानं दोन वेळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण...
rohidas jadhav death
rohidas jadhav death sarkarnama

सोसायटीत शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तक्रार देऊनही अटक केली नव्हती. यातूनच एका तरुणानं मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) वाघोली पोलिस ( Wagholi Police Station ) चौकीसमोर स्वत:ला पेटवून घेतलं होतं. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली होती. आता पेटवून घेतलेल्या या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

rohidas jadhav death
Loksabha Election 2024 : सुनेत्रा पवार बारामती लोकसभा लढविण्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राजकारण म्हणजे..."

रोहिदास अशोक जाधव, असं मृत तरुणाचं नाव आहे. रोहिदास लोणीकंद येथील सिद्धी पार्क सोसायटीत राहत होता. या सोसायटीत त्याचा बांधकाम व्यावसायिकासह दोघाजणांबरोबर पाणी आणि अन्य कारणांवरून वाद होता. याविरोधात रोहिदासनं दोन वेळा पोलिसांत तक्रार दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बांधकाम व्यावसायिक शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचा आरोप रोहिदासनं केला होता. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यावसायिकाविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. पण, मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी रोहिदासनं केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यानं 13 फेब्रुवारीला वाघोली पोलिस ठाण्यासमोर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत रोहिदासनं पेटवून घेतलं होतं.

rohidas jadhav death
Supriya Sule : सेल्फी अन् संसदेतील भाषणावरून अजितदादांचा टोला, सुप्रिया सुळेंचं जशास तसं उत्तर; म्हणाल्या...

यानंतर रोहिदासला तातडीनं सूर्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यात रोहिदास 90 टक्के भाजला होता. मात्र, आज रोहिदासचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेत लोणीकंद ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांची तडकाफडकी बदली केली होती. तसेच, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

( Edited By : Akshay Sabale )

R

rohidas jadhav death
Shirur Loksabha : अजितदादांच्या मनात नेमकं चाललंय काय? कोल्हेंचा पराभव करणारा शिरूरमधील उमेदवार कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com