Rohit Pawar : निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांना का झाली KGFच्या गरुडाची आठवण?

Rohit Pawar NCP leader on the Mahayuti government : राज्य सरकारने आता घाईगडबडीत राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी कार्यक्रम घेण्याचा निश्चित केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज साडेतीन वाजता पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने आजच आचारसंहिता लागणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी राज्य सरकारने आता घाईगडबडीत राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी कार्यक्रम घेण्याचा निश्चित केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आला आहे. त्यात आज दुपारी १२ वाजता राज्यपाल नाम नियुक्त सात विधान परिषद सदस्यांचा शपथविधी होणार असून उपसभापती डॉ नीलम गोर्‍हे या शपथ देणार आहेत असं नमूद करण्यात आला आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, १५ ऑक्टोबर २०२४- महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील. विधान भवन (Vidhan Bhavan) मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. आज शपथ घेत असलेल्या नामनियुक्त सन्माननीय सदस्यांची नावे पुढीप्रमाणे - चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत श्रीराम पाटील, डॉ मनीषा कायंदे यांचा नावाचा समावेश आहे.

Rohit Pawar
Sharad Pawar : पक्षांतर्गंत हुकूमशाहीला विरोध करत दादांचा बडा नेता साहेबांच्या भेटीला; ‘तुतारी’ फुंकण्याचे दिले संकेत

या शपथविधीची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे त्यामध्ये रोहित पवार म्हणाले, 'शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने शेवटच्या दिवशी सुद्धा घटनेला तडे देण्याचे प्रयत्न सोडलेले नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील शेवटच्या दिवशी आमदार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

Rohit Pawar
Bopdev Ghat Gang Rape : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट ; पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या!

KGF च्या गरुडा- अधिराप्रमाणे सर्व नियम कायदे बाजूला सारून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागणाऱ्या या संविधनविरोधी सरकारचा अंत केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. असो सरकारला सत्तेतून महाराष्ट्र हद्दपार करेल याची शाश्वती आली असावी आणि या भीतीतूनच आमदार नियुक्तीचा निर्णय घेतला असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com