NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कधी होणार निर्णय, रोहित पवारांनी सांगितला मुहूर्त

Ajit Pawar And Sharad Pawar NCP : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे. तसा अनेकांना पडला आहे. मात्र...
Ajit Pawar and Sharad pawar
Ajit Pawar and Sharad pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि येणार असतील तर त्यावर ती कधी निर्णय घेण्यात येणार याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. अशातच एकत्रीकरणावरबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खुलासा केला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये शनिवारी (ता.31) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे. तसा अनेकांना पडला आहे. मात्र आजपर्यंत फक्त ही चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व आमदारांना घेऊन सुप्रिया सुळे,शरद पवार,जयंत पाटील यांनी आम्हांला काहीही सांगितले नाही. जर आम्हाला काही कळलं आणि काही घडणार असेल तर आम्ही नक्कीच माध्यमांसमोर या सगळ्या गोष्टी उघड करू, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी जयंत पाटील आणि रोहित पवार आग्रही असल्याचा चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत विचारला असता रोहित पवार म्हणाले, असं काही नाही सध्या सरकारच्या धोरणावर सर्वाधिक टीका ही मी करत आहे. सरकारच्या विरोधात सर्वाधिक आक्रमक मी आहे. त्यामुळे या सर्व चर्चा बिन बुडाच्या असल्याचं रोहित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळे या पाच जूनपर्यंत परदेश दौऱ्यावर आहेत. त्या सध्या इतर देशांमध्ये जाऊन आपल्या देशाची भूमिका मांडत आहेत. शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबता निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्या परत आल्यानंतर याबाबत योग्य ती भूमिका मांडतील असं रोहित पवार म्हणाले.

Ajit Pawar and Sharad pawar
Dhananjay Mahadik : मुन्नांचे ते चार सवाल गोकुळमध्ये बंटींना अडचणीत टाकणार? चुयेकरांच्या मुलाला बळीचा बकरा केल्याचा दावाही

रोहित पवार पुढे म्हणाले, विलीकरणाबाबतची कोणतीही चर्चा आद्याप आमच्या सोबत झालेली नाही. साहेबांनी याबाबतची जबाबदारी सुप्रिया सुळे यांना यांच्यावर दिली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या जेव्हा येतील आणि याबाबत स्पष्टता देतील त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

रोहित पवार म्हणाले, पुढच्या पिढीची जबाबदारी ही शरद पवारसाहेबांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे. त्या पक्षाच्या कार्यअध्यक्ष आहेत. विलिनीकरणाबाबतच्या चर्चेचे आणि निर्णयाची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर आहे, असं सांगत सुप्रिया सुळे या परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच विलिनीकरणाबाबतच्या चर्चा आणि निर्णय होणार असल्याचे रोहित पवार यांनी सूचक इशारा दिला.

Ajit Pawar and Sharad pawar
Modi Solapur Tour : मोदींना सोलापुरात आणण्याची जबाबदारी जयकुमार गोरेंनी सोपवली चंद्रकांत पाटलांवर....

भाजपवर टीका करून ज्या पद्धतीने तुम्ही लोकांची बाजू घेत आहात त्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. मात्र अशा पद्धतीने जे लूज टॉक माध्यमांसमोर होऊ नये याची काळजी संजय राऊत यांनी घेण आवश्यक असा देखील सल्ला रोहित पवार यांनी दिला.

स्थानिक स्वराज यांच्या निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी ची तयारी आमच्याकडून सुरू आहे. मात्र, त्यामध्ये अधिक सुसूत्रता यावी यासाठी येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवीन येणारी कार्यकारिणी शरद पवार यांच्याशी चर्चा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवेल असं रोहित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com