रोहित पवारांनी लिहीले पत्नीसाठी लव्हलेटर; म्हणाले 'माझ्या आयुष्यात तुझं स्थान...

NCP | Rohit Pawar|Kunti Pawar| राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत.
Rohit Pawar|Kunti Pawar|
Rohit Pawar|Kunti Pawar| Facebook/@RohitPawar
Published on
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. आपल्या काही सहकाऱ्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ते ब्रिटन दौवऱ्यावर गेलेत. मात्र या दौऱ्यात बिझी असतानाही ते सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच अॅक्टिव्ह आहेत. आपले अनेक फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

अनेकदा सार्वजनिक जीवनात वावरताना नेतेमंडळीचं आपल्या जवळच्या व्यक्तींकडेच दुर्लक्ष झाल्याचे आपण पाहिले आहे. पण रोहित पवार यांनी आपल्या पत्नीसाठी एक खास पोस्ट केली आहे. आपल्या पत्नीविषयी भावना व्यक्त करताना ते थोडे इमोशनल देखील झाले आहेत. याचं कारण म्हण्जे आज रोहित पवार यांच्या लग्नाचा १२ वा वाढदिवस (Rohit Pawar's wedding anniversary) आहे. या निमित्तानं त्यांनी आपली पत्नी कुंती पवार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Rohit Pawar|Kunti Pawar|
अजित पवार म्हणाले,'आम्ही विसरत नाही, वेळ आली की प्रत्येकाची दखल घेतो'

वाचा, काय लिहीलं आहे रोहित पवारांनी

प्रिय कुंती!
#HappyAnniversary

माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं.

मी सार्वजनिक जीवनात असल्याने मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, म्हणून तू स्वतःहून हा निर्णय घेतलास. तो वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास आणि विशेष असं आहे आणि ते नेहमीच तसं राहील.

आज आपल्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली. वैवाहिक आयुष्याच्या यशस्वी तपपूर्तीनिमित्त आणि पुढंही वर्षानुवर्षे एकमेकांची साथ अशीच कायम राहणार असल्याबद्दल Thank U #कुंती!

#Happy_anniversary

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com