Baramati Loksabha : 'संभाजी भिडेंनी अजित पवारांना कानमंत्र दिला?', रोहित पवारांनी काकाला सुनावले

Rohit Pawar : अजित पवार यांची संभाजी भिडे यांच्यासोबत भेट झालेला फोटोदेखील रोहित पवारांनी ट्विट केला. तसेच महात्मा फुले वाड्याला अजित पवारांनी भेट न देण्याचा कानमंत्र संभाजी भिडे यांनी दिला असावा, असा संशय व्यक्त केला.
Rohit Pawar
Rohit Pawarsarkarnama

Loksabha Election : सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोबत जात दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. सांगलीमध्ये अजित पवार महायुतीच्या Mahayuti उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले असताना त्यांची संभाजी भिडेंशी भेट झाली. याच कारणावरून आमदार रोहित पवार यांनी आपले काका अजित पवार यांना टार्गेट केले आहे.

Rohit Pawar
Chhagan Bhujbal Nashik Loksabha : छगन भुजबळ यांची नाशिकमधून माघार, सांगितले खरे कारण...

'अजितदादा (Ajit Pawar) उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्राकाकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता,' असा टोला ट्विटरवरून रोहित पवारांनी (Rohit Pawar) आपले काका अजित पवार यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांची संभाजी भिडे यांच्यासोबत भेट झालेला फोटोदेखील रोहित पवारांनी ट्विट केला. तसेच महात्मा फुले वाड्याला अजित पवारांनी भेट न देण्याचा कानमंत्र संभाजी भिडे यांनी दिला असावा, असा संशय व्यक्त केला. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये ' कदाचित नव्या संगतीच्या परिणामाने आपण तिकडं दुर्लक्ष केलं की महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका कथित गुरुजींशी आपली चर्चा झाल्याने त्यांनी भिडे वाड्याला नमस्कार न करण्याचा कानमंत्र आपल्याला दिला, हे माहीत नाही', असेदेखील म्हटले आहे.

अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुलींचा कमी होणाऱ्या जन्मदरावर चिंता व्यक्त करताना पुढे द्रोपदीचा विचार करावा लागतो की काय, असे म्हटले होते. मात्र पुढे तत्काळ त्यांनी यातील गमतीचा भाग सोडा नाहीतर मी द्रोपदीचा अपमान केला. मला कोणाचाही अपमान करायचा नाही, असे म्हणत अजित पवारांनी हात जोडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून 'पण बाकी काही असो, आपला 'मोदी टू द्रौपदी' प्रवास मात्र एक्स्प्रेस झाला!' असेदेखील ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे.

  • R

Rohit Pawar
Madha Lok Sabha 2024 : फडणवीस, पवारांना भेटलेले जानकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार की स्वतंत्र अस्तित्व ठेवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com