Amar Sable : 'आरपीआय'ने सोलापूर मतदारसंघावर दावा ठोकूनही भाजपचे इच्छूक अमर साबळे निर्धास्त का?

RPI Ramdas Athawale : महाराष्ट्रातील दोन जागांसह देशात दहा जागांची मागणी रामदास आठवलेंनी केलेली आहे.
Amar Sable
Amar SableSarkarnama

Solapur Loksabha Election : आगामी लोकसभेला महाराष्ट्रातील दोन जागांसह देशात दहा जागांची मागणी आरपीआयचे (आठवले गट)राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी कोरेगाव भीमा येथे केली आहे.

त्यामुळे भाजपचे थोडे टेन्शन वाढले आहे. कारण त्यांचा खासदार आणि बालेकिल्ला असलेल्या सोलापूरवरच आठवलेंनी दावा केला आहे.

सोलापूर आणि शिर्डी या दोन राखीव जागांवर आरपीआयने दावा ठोकला आहे. शिर्डी हा आठवले, तर सोलापूर हा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी आरपीआयने भाजपकडे मागितला आहे. मात्र, त्यांना फक्त एकच जागा मिळू शकते.

यास सोलापूरमधील भाजपचे इच्छूक आणि माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे(Amar Sable) यांनी मंगळवारी सरकारनामाशी बोलताना दुजोरा दिला. आठवले यापूर्वी लढलेले शिर्डीची जागा आऱपीआयला मिळू शकते. कारण तेथे पक्षाचा खासदार नाही,असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूरमध्ये डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य तथा सिद्धेश्वरस्वामी हे भाजपचे(bjp) खासदार आहेत. तेथून यापूर्वीही त्यांचाच उमेदवार निवडून आलेला आहे.त्यामुळे हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याने भाजप हा आरपीआयला देण्याची सुतराम शक्यता नाही.

कारण तेथील सहापैकी चार आमदार हे भाजपचे, एक अजित पवार राष्ट्रवादीचा आणि एक कॉंग्रेसचा आहे.त्यामुळे तेथून भाजपच लढणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे गणित साबळे यांनी मांडले. त्यामुळे आपली सोलापूरची तयारी सुरु असल्याचे त्यांनी एकप्रकारे स्पष्टच केले.

जात प्रमाणपत्रावरून वादग्रस्त ठऱलेले सोलापूरचे विद्यमान खासदार डॉ.जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिपीट न करण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी नुकतेच तेथील निव़डणूक तयारीच्या बैठकीनंतर दिले आहेत.त्यामुळेच तेथून साबळे यांनी तयारी सुरु केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले आहे.

खासदार शिवाचार्य यांनी मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेले बेडा जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्दे केल्याने हे प्रकरण नंतर उच्च न्यायालयात गेले. त्यामुळे त्यांना पुन्हा तिकिट मिळण्याची शक्यता कमी झाली.परिणामी सोलापूरात तगडा उमेदवार देऊ, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com