Rupali Chakankar News : रुपाली चाकणकर म्हणाल्या, खडकवासल्यातून आमदार व्हायचंय!

NCP News : जिथे स्पर्धाच नसेल तर तुम्ही विजेता कसे ठरता...
Rupali Chakankar
Rupali Chakankar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभेच्या २०१९ साली झालेल्या निवडणुकीत खडकवासल्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत झाली होती. यात भाजपच्या भीमराव तापकीरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडकेंचा निसटता पराभव केला होता. मात्र,आता खडकवासला मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी मोठं विधान करताना खडकवासल्यातून आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रुपाली चाकणकरांनी 'सरकारनामा विशेष' मुलाखतीत खडकवासला मतदारसंघाच्या उमेदवारीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. चाकणकर म्हणाल्या, मागच्या निवडणुकीवेळीच मी उमेदवारीसाठी अर्ज अजित पवारांकडे दिला होता. मात्र,माझी ज्यादिवशी मुलाखत होती. त्याच दरम्यान अगोदरच्या महिला प्रदेशाध्यक्षा पक्ष सोडून गेल्या. खरंतर निसर्ग मंगल कार्यालयात सर्वच इच्छुक उमेदवारांचीही मुलाखत होती.त्यात माझीही मुलाखत होती. पण आता खडकवासल्यातून आमदार होण्याची इच्छा रुपाली चाकणकरांनी(Rupali Chakankar) व्यक्त केली आहे.

Rupali Chakankar
Balasaheb Thorat News: राजीनामा मागे घेणार? बाळासाहेब थोरातांचे सूचक वक्तव्य...

मागच्यावेळी खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी(Ncp)त स्पर्धक खूप होते या प्रश्नावर बोलताना चाकणकर म्हणाल्या, स्पर्धक असेल तर तुम्हांला काम करायला मजा येते. तुमच्या कामाचं मूल्यांकन करता येतं. जिथे स्पर्धाच नसेल तर तुम्ही विजेता कसे ठरता. स्पर्धकच नसेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. त्यामुळे स्पर्धक हवेच असंही चाकणकर म्हणाल्या.

Rupali Chakankar
Lok Sabha Election : भाजपला २०२४ मध्ये बहुमत मिळणे अवघड; प्रादेशिक पक्ष महत्वाची भूमिका बजावणार : नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांचे निरीक्षण

...म्हणून भाजप प्रवेशाच्या चर्चा होत असाव्यात!

विरोधकांना माझ्या भाजपप्रवेशाच्या चर्चा करताना जास्त उत्साह वाटत असावा. पण कदाचित मुख्यमंत्री महिला आयोगाच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहणार होते. कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री प्रोटोकाँलनुसार महिला आय़ोगाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो. त्याचमुळे या चर्चा होत असतील. आणि पहिल्यांदाच सत्ताधारी एका पक्षाचे आणि महिला आय़ोगाच्या अध्यक्षा दुसऱ्या पक्षाच्या आहेत असं घडलं असावं असेही स्पष्टीकरण चाकणकरांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com