Rupali Chakankar : राजगुरूनगरमधील 2 बहि‍णींची हत्या करणाऱ्या आरोपीविरोधात राज्य महिला आयोगाने उचललं मोठं पाऊल

Rajgurunagar Crime Case : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजगुरूनगर आणि लोणावळा येथील लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या दोन्ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 Dec : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजगुरूनगर आणि लोणावळा येथील लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या दोन्ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शिवाय या प्रकरणाचा तपास पोलिस चांगल्या पद्धतीने करत असल्याचंही चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितलं आहे. राजगुरूनगरमध्ये दोन बहिणींची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. तर या दोन्ही मुलींची हत्या त्यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्याने केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

या नराधम आरोपींनी या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचंही तपासात समोर आलं आहे. तर दुसरीकडे लोणावळ्यात एका पोलिसांनी (Police) मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली.

चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राजगुरूनगरमधील आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा फायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलींची हत्या केली. एसपी पंकज देशमुख आणि त्यांची सर्व टीम चांगल्या पद्धतीने तपास केला.

मिसिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केलं. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालवलेली असल्यामुळे त्या मुली त्या भागांमध्ये लग्न असेल किंवा एखादं धार्मिक कार्य असेल जेवणासाठी जायच्या. त्यामुळे केस दाखल झाल्यापासून त्यांचा शोध घेण्यासाठी पिलोसांनी परिसरातील सर्व मंगल कार्यालय आणि धार्मिक विधी चालू असतील तिथे जाऊन तपास केला.

Rupali Chakankar
Dharashiv Sarpanch Attack : बीडनंतर आता धाराशिव हादरलं! पुन्हा सरपंच 'टार्गेट'; दगडाने गाडीच्या काचा फोडत अन् पेट्रोल टाकून...

पण रात्री पावणे बारा वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या ड्रममध्ये या दोन्ही मुलींचं मृतदेह आढळून आले. या घटनेतील आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर सगळे रेल्वे स्टेशन्स किंवा पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या आणि साडेचार तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शिवाय आरोपीवर गुन्हे दाखल करत त्याला या प्रकरणात फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तसंच यावेळी त्यांनी जे लोक परराज्यातून जर तुमच्या परिसरात रहायला येतात त्यांची माहिती तातडीने आपल्या जवळच्या पोलिसांना कळवा, असं आवाहन देखील केलं. शिवाय या सगळ्या घटनांमध्ये जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Rupali Chakankar
Manmohan Singh : मनमोहन सिंग यांची 'ती' इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही..., आयुष्यभर राहिलेली खंत मृत्यूनंतरही कायम

त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करून याआधी कोल्हापूरच येथील एका गावात जी अत्याचाराची घटना घडली त्या आरोपीलाही फाशीची शिक्षा सुनावली होती, तशीच या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी पाठपुरावा करू आणि या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून लवकरात लवकर त्या निकाली काढल्या जातील असंही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, लोणावळा येथील घटनेतील आरोपी 2 महिन्यांपूर्वी पोलिस खात्यात आला होता. ख्रिसमस दिवशी त्याची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. ज्या मुलीवर अत्याचर झालं त्या मुलीच्या कुटुंबाच हॉटेल आहे. आरोपीने 8 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला आहे. त्याला पोलिस खात्यातून बडतर्फ करत अटक केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com