
Tuljapur News : मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.संतोष देशमुख प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप,धक्कादायक खुलासे,आरोपींच्या अटकेची मागणी यामुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण तापलं आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे.
मस्साजोगच्या घटनेची दहशत कायम असतानाच दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असतानाच आता पुन्हा एका सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तुळजापूरमध्ये बीडच्या घटनेची पुनरावृत्ती घडल्याचे दिसून येत आहे.
मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.26)रात्री करण्यात आला आहे.सरपंच नामदेव निकम हे भावासह गाडीत बसले असताना त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी हल्लेखोरांनी सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीच्या काचाही दगडाने फोडल्या आहेत. यानंतर त्यांनी निकम यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला.तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगामध्ये ही अंगाचा थरकार उडवणारी घटना घडली आहे.
तुळजापूर येथे गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.हा हल्ला जो आहे तो, पवनचक्कीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.यापूर्वीही अशा हल्ल्याच्या अनेक घटना धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात घडल्याचे दिसून येत आहे. जवळगा येथील घटनेत सरपंच आणि त्यांचा भाऊ ह दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून या घटनेतील आरोपींचा शोध सुरू आहे.
विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. त्यातच मुंडेंच्या कार्यकर्त्यांने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी लगेचच याप्रकरणी कारवाई करीत वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयला अटक केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.