Rupali Patil Vs Rupali Chakankar : 'तो' व्हिडिओ व्हायरल, रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना धू धू धुतले, म्हणाल्या, 'चाकणकर आयोगावर...'

Rupali Patil Thombare Criticized Rupali Chakankar : जुने व्हिडिओ टाकून माझी बदनामी करण्यात येत असल्याचे देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.
Rupali Chakankar , Rupali Thobare Patil
Rupali Chakankar , Rupali Thobare Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांची भूमिका योग्य पद्धतीने बजावली नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील त्यांना टार्गेट केले. त्यांच्या विरोधात टिकेची झोड उठवली आहे. चाकणकरांना विरोधी पक्षातील महिला नेत्यांनी घेरलेला असतानाच स्वपक्षातील असलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी देखील चाकणकरांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये महिला आयोगाच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त करत या प्रकरणातील आयोगाच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी देखील मागणी केली आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन महिला नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोपाचे सोशल मीडियावर रंगले असल्याचे पाहायला मिळत आहे.

या वादामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची देखील भूमिका पाहायला मिळाली. अंधारे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी असंवेदनशीलला दाखवली असली तरी ठोंबरेंच्या रूपाली यांनी दाखवलेली संवेदनशीलता, वैष्णवीचे बाळ कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. असे म्हटले होते.

यानंतर आता रूपाली चाकणकर फॅन क्लब या फेसबुक पेजवरून रूपाली पाटील ठोंबरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आले असल्याचे रूपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितला आहे. जुने व्हिडिओ टाकून माझी बदनामी करण्यात येत असल्याचे देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.

Rupali Chakankar , Rupali Thobare Patil
Beed News : बडतर्फ रणजीत कासलेच्या आरोपानंतर बीड कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी बक्सार मुलानी यांची तडकाफडकी बदली!

चाकणकर आयोगावर नव्हती...

याबाबत ठोंबरे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात ठोंबरे पाटील म्हणाल्या, रुपाली चाकणकर अकाऊंट वरून माझ्या पेजचे जुने व्हिडिओ टाकत आहेत 2017, 2018 ला घडलेली घटना त्यावेळी सर्व मीडियावर आले आहेत तपासून घेत जा बरे. तोंडावर आपटणार नाहीत म्हणजे. हो माझे व्हिडिओ आहे मंडई पोलिस चौकीतला. महिलेचा अश्लील व्हिडिओ आणि अत्यंत घाण टिप्पणी केली होती.आणि वेड्याचे सोंग घेत होता तो विकृतावर गुन्हाही दाखल केला. तेव्हा चाकणकर आयोगावर नव्हती बरं का?

लाचारी पत्करत नाही...

तुम्ही आयोगावर राहून महिलेची तक्रार टाळाटाळ करण्यापेक्षा डायरेक्ट पीडित महिलेला न्याय आणि विकृतीला त्याच भाषेत उतर देऊन महिलेला दिलेला आधार महत्त्वाचा असतो. तो नाही कळणार चाकणकर व त्याच्या चेल्याना असो. होऊ द्या वायरल आम्ही न्याय देतो. अगदी बेधडक कोणतीही लाचारी न पत्करता, अशी टीका रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

Rupali Chakankar , Rupali Thobare Patil
Kolhapur Politic's : राजेश क्षीरसागरांनी फोडला बॉम्ब; ‘काँग्रेसचे 35 नगरसेवक शिवसेनेत दाखल होणार’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com