Chhagan Bhujbal News: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सगेसोयरे मुद्द्यावरून सुरू केलेलं उपोषण मनोज जरंगे पाटील यांनी आपले नुकतच स्थगित केलं आहे. मात्र या विषयावर आता वडीगोद्री (जालना) येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला(OBC Reservtion) धक्का न लावता देण्यात यावे. तसे न करता आरक्षण दिल्यास ओबीसी समाज बांधव राज्य शासनाला योग्य तो धडा शिकवतील. त्यामुळे या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, या मागणीसाठी हाके यांनी उपोषण सुरू केले आहे.
वडीगोद्री येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्राध्यापक हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याशी चर्चा केली.
उपोषणाला समता परिषदेचा सक्रिय पाठिंबा असेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार या शिष्टमंडळाने प्रा. हाके यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी मंत्री भुजबळ(Bhujbal) यांच्याशी प्राध्यापक हाके यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. ओबीसी समाजाचे आरक्षण हा अतिशय संवेदनशील विषय आहे. याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन भुजबळ यांनी दिले. भुजबळ यांनी गरज पडल्यास या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.