

Pune News : फलटण मधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणांमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पीडित महिलेचा चरित्र हनन केलं असल्याचा आरोप विरोधी पक्षातील महिला नेत्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षातून आरोप होत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी देखील आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेला रूपाली चाकणकरांनी वर गंभीर आरोप करत आंदोलन केले आहे.
पुण्यामध्ये महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय महिला नेत्यांनी गुडलक चौक येथे आज आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात वापरण्यात आलेल्या घोषणा सध्या चर्चेचा विषय बनत आहेत.
या आंदोलनामध्ये आंदोलकांनी रूपाली चाकणकर यांचे व्यंगचित्र असलेले पोस्टर बनवून आणले होते. या पोस्टर बरोबरच काही घोषणा देखील देण्यात आल्या. सध्या या घोषणा चर्चेचा विषय बनत आहेत.
एका पोस्टर मध्ये चेटकिणीचे व्यंगचित्र काढून त्यावर रूपांतर करून महिलांचं शोषण करणाऱ्या चेटूकार असं लिहिण्यात आलं होतं. तर काही पोस्टर मध्ये 'मेकअप करके खडी तो सबसे बडी, झगा मगा आणि मला बघा, 800 खिडक्या 900 दार कोण्या वाट्याने गेली ती महिला आयोगाची नार, महिला आयोगाचे काम आणि मेकअप साठी थांब, दार उघड बये महिलांना न्याय देण्यासाठी दार उघड', माकडाच्या हाती कोलीत आणि टिंब टिंब च्या हाती महिला आयोग,' अशा प्रकारचे आंदोलनातील पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
या आंदोलनादरम्यान रूपाली पाटील ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांच्या वर महिला आयोगाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच आपण वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली असून लवकरच वरिष्ठ यावरती निर्णय घेतील असं देखील रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या त्यानंतर त्यानंतर रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर आंदोलकांनी चाकणकरांचा पोस्टर जाळला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.