मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihar Vajpayee) यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपनं निधी उभारण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील यांनीही देणगी दिली असून देशाील वेगवेगळे कार्यकर्ते या देणगी अभियानाशी जोडले जात आहेत.
‘माइक्रो डोनेशन अभियान’ असं या अभियानाचं नाव आहे. हे अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. या अभियामानवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चर्चेचा विषय केला आहे. काही दिवसापूर्वी मनसेतून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या अभियानावर टीका केली आहे. त्यांनी टि्वट करुन मोदी सरकार व भाजपवर निशाणा साधला आहे.
''भाजपाला एक हजार रुपये देणगी दिल्याने, देश कसा मजबूत होईल ? यावर एक तज्ज्ञ समिती नेमायला हवी का? यह पब्लिक है, सब जानती है. ज्याच्या पक्षाची अर्थव्यवस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत करतील?'', असा सवाल रुपाली पाटील यांनी टि्वट करुन उपस्थित केला आहे.
मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील या पूर्वीसारख्याच आक्रमक झालेल्या दिसतात. काही दिवसापासून त्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संबित पात्रा यांच्यावर टि्वट करीत टीका करीत आहेत. आज त्यांनी थेट मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी भाजपला दिलेल्या देणगीच्या पावतीचा एक फोटो ट्विट केला. हा फोटो ट्विट करत मोदी म्हणाले की, राष्ट्रहित हे भाजपचे प्रथम प्राधान्य आहे. त्याला अनुसरूनच भाजप पुढे वाटचाल करत आहे. भाजपचे कार्यकर्ते हे आयुष्यभर निस्वार्थी सेवेने आपले योगदान देत आहेत. तुमचं एक छोटंसं दान किंवा देणगी भाजप कार्यकर्त्यांच्या सेवाकार्याला बळकटी देण्याचे मोलाचे काम करु शकते. भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी तसंच देशाला भक्कम बनवण्यास भाजपाल मदत करण्यासाठी योगद्यान द्यावे’
कर्नाटक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यानंतर भाजप नेते संबित पात्रा यांनी हे टि्वट करीत नवीन वाद निर्माण केला आहे. यावरूनच रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी संबित पात्रा यांच्यावर टीका केली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''भाजप “संबंधित पात्र” बरळलं, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप याची तुलना स्वतःच्या नेत्याशी केली. भाजपचा शिवद्रोह उघडा पडत आहे. कारण धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्ता लाटणाऱ्यांनो लोक समजून गेलेत “गंगाधर हि शक्तिमान है”.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी फडणवीसांना चांगलेच सुनावले होते. आपल्या टि्वटमध्ये रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात, ''कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस साहेब , आज सभागृहात मोदींची नक्कल होताच “तडफनीस” झाले’, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच शिवप्रेमी दूधखुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे? महाराष्ट्रा समोर उघडे पडले आहे,''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.