S. Jaishankar News : 'मला कोणी जर विचारलं, तुम्हाला परदेशात जाऊन बोलण्याचा एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो?, तर..'

S. Jaishankar Visit to Pune : पुण्यात केंद्रीयमंत्री एस.जयशंकर यांनी सांगितलं कारण ; जगभरात भारताच्या वाढलेल्या वर्चस्वाबाबतही ते बोलेल आहेत.
S. Jaishankar News
S. Jaishankar NewsSarkarnama
Published on
Updated on

S. Jaishankar on INDIA's Power in World : केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे आज(शनिवार) पुण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मीडिया सेंटरची उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यानंतर त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना जागतिक पटलवार भारताच्या वाढलेल्या महत्त्वाबाबत सांगितलं.

एस.जयशंकर म्हणाले, 'जर मला कोणी विचारलं की तुम्हाला बाहेर जाऊन बोलण्यासाठी एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की मोदींच्या सरकारच्या परराष्ट्र मंत्री असणं हेच मला कॉन्फिडन्स देतं. कारण, आपण तेवढं काम केलेलं आहे. एकदा मोदींनी(Modi) सांगितले होते की पूर्वी त्या देशांचं वर्चस्व होतं ज्यांचाकडे सगळ्यात जास्त नैसर्गिक संसाधन आहेत. पण आता इथून पुढे ज्या देशांकडे लोकांचं आणि त्यांच्या टॅलेंटचं बळ आहे त्यांचं वर्चस्व असेल आणि आपल्याकडे ती क्षमता आहे. '

S. Jaishankar News
Amit Thackeray Interview : ...अन् अमित ठाकरे म्हणाले 'कर्म कुणालाच चुकत नाही'

याशिवाय ' आपल्या देशाचं एवढं नाव झालय ते एका कारणामुळे नसून असे बरेच प्रकल्प आहेत ज्यामुळे हे झालं आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून बघितलं तर पहिले आपल्याकडे योग्य इंफ्रास्ट्रक्चर नव्हतं पण आता ते आहे. जवळपास आज भारतामध्ये रोज 12 किलोमीटर चे रेल्वे ट्रॅक आणि 30 किलोमीटर चे हाईवे बांधले जात आहे.' असंही एस. जयशंकर(S. Jaishankar) यांनी सांगितलं.

S. Jaishankar News
Ashwini Kadam and Sachin Dodke : खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके, तर पर्वतीमधून अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर!

याबरोबर एस जयशंकर यांनी यावेळी सांगितलं की, जगभरातील देशांचा भारतावर प्रचंड विश्वास आहे. यासाठी त्यांनी G-20 शिखर परिषद, रशिया-युक्रेन युद्ध परिस्थतीत भारताची महत्त्वपूर्ण भूमिका, आफ्रिकन युनियनचे सदस्यत्व याचबरोबर करोना महामारीच्या कालखंडात भारताने जगाला केलेली मोठी मदत यांचा उल्लेख केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com