Raj Thackeray : 'सामना' ने पहिल्यांदाच उधळली राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं...

Andheri By election : मराठी एकजूट तुटू नये, ही आमची एकमेव इच्छा..
Andheri By election
Andheri By election sarkarnama
Published on
Updated on

पुणे : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं (BJP) अखेर माघार घेतली. मुरजी पटेल (Murji Patel) यांनी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा अर्ज मागे घेतला. भाजपनं अंधेरी पोटनिवडणूक लढू नये, असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) लिहिलं होतं. त्यानंतर भाजपने पटेल यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले. (Raj Thackeray latest news)

राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत घेतलेल्या भूमिकेवरुन आजच्या'सामना'मध्ये राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. "आमच्या मनात जळमटे नाहीत, मराठी एकजूट तुटू नये, ही आमची एकमेव इच्छा," असे म्हणून एक प्रकारे राज ठाकरे यांना आवाहन केले आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपवर हल्लाबोल केला आहे.

"अंधेरीची पोटनिवडणुक हे फक्त निमित्त मात्र खरा हेतू म्हणजे मिंदे गटाला हाताशी धरून पक्षाचं नाव व चिन्ह आयोगाकडून गोठवणे हाच होता. भाजपने जरी निवडणुकीतून माघार घेतली तरी निवडूक ती होतचं आहे. महाराष्ट्रात मढ्यावरचं टाळूवरचं लोणी खाऊ नये ही महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती आहे. अंधेरी पोट निवडणुकीत निर्णय घ्यायला भाजपला उशिर झाला," असे अग्रलेखात नमूद केले आहे.

मैदानात आज नाहीतर उद्या उतरु आज तरी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांचे आभार, आमच्या मनात जळमटे नाहीत, मराठी एकजूट तुटू नये ही आमची इच्छा आहे, अशा शब्दात पहिल्यांदाच 'सामना'च्या अग्रलेखात राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com