Chinchwad by-election : चिंचवडमध्ये अजूनही सस्पेन्स कायम; ठाकरेंचा निरोप घेऊन अहिर कलाटेंना भेटणार...

Rahul Kalate News : चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली
Rahul Kalate, Sachin Ahir News
Rahul Kalate, Sachin Ahir NewsSarkarnama

Chinchwad by-election : चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. मात्र, ठाकरे गटाचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निरोप घेऊन राहुल कलाटे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी चिंचवड मतदारसंघात घडण्याची शक्यता आहे. जनभावनेचा अनादर मी करणार नाही, असे कलाटे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नाना उर्फ विठ्ठल काटे यांना उमेदवारी दिली आहे. बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

Rahul Kalate, Sachin Ahir News
Sanjay Bansode News : जनता नव्या सरकारला कंटाळली, महाविकास आघाडीचे दोनशे आमदार निवडून येतील..

महाविकास आघाडीकडून कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. उद्या सचिन अहिर हे भेटणार आहेत. बहुदा त्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले असावे, असेही कलाटे यांनी सांगितले. त्यामुळे सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन कलाटे यांची भेट घेणार, असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे सचिन अहिर यांना कलाटे यांची बंडखोरी रोखण्यात यश येते की नाही, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कलाटे निवडणुकीच्या रिंगणात राहिले तर आघाडीला निवडणूक जड जाईल. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी सामना होईल. यामुळे राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवाराला फटका बसू शकतो, असी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Rahul Kalate, Sachin Ahir News
Bacch kadu : अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटतील, बच्चू कडूंचा दावा !

चिंचवड पोटनिवणुकीसाठी उद्या अर्ज मागारी घेण्याची शेवटची तारीख आहे. आज एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे उद्या काय होते यावरच चिंचवड पोटनिवणुकीची दिशा ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कलाटे यांची मनधरणी सुरु आहे. त्याला यश येणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com