Sambhajiraje Chhatrapati : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बंडखोरांना संभाजीराजेंकडून बळ; कोथरूड, शिवाजीनगरसाठी मोठा निर्णय

Sambhajiraje Chhatrapati Assembly Election Jan Swarajya Party : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील विजय डाकले यांनी बंडखोरी करत भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
 Sambhajiraje Chhatrapati Jan Swarajya Party
Sambhajiraje Chhatrapati Jan Swarajya Party Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनीष आनंद आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विजय डाकले यांना संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने अधिकृत पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील चार विधानसभा (Vidhan Sabha Election) मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार विरोधात काँग्रेसच्या बंडखोरांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील विजय डाकले यांनी बंडखोरी करत भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

राज्यभरात बंडखोरी केलेल्या नेत्यांवर काँग्रेसच्या पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये आबा बागुल, मनीष आनंद आणि कमल व्यवहारे यांचा समावेश आहे. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) देखील विजय डाकले यांच्यावर देखील पक्ष विरोधी कारवाई केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 Sambhajiraje Chhatrapati Jan Swarajya Party
Pramod Sawant : 'महाविकास आघाडीच्या काळातचं उद्योग महाराष्ट्राबाहेर', प्रमोद सावंतांनी साधला निशाणा

मात्र आता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर मनीष आनंद आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विजय डाकले यांना संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाने पाठींबा दर्शवला आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची देखील डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत, माहिती देताना स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव म्हणाले की, "महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा लोकहिताच्या मुद्द्यांसाठी वचनबद्ध आहे. मनीष आनंद आणि विजय डाकले हे दोन्ही उमेदवार स्थानिक समस्यांना जाणून घेत सकारात्मक दृष्टिकोनाने काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होईल, असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांमुळे त्या-त्या मतदारसंघात सकारात्मक बदल होईल, असा आमचा विश्वास आहे."

 Sambhajiraje Chhatrapati Jan Swarajya Party
Bapu Pathare: राज्याचे नुकसान करणाऱ्या त्रिकुटाला शिक्षा करा ! जयंत पाटील गरजले 

मनीष आनंद हे शिवाजीनगर मतदारसंघात प्रामुख्याने शैक्षणिक सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि बेरोजगारीच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. तर विजय डाकले कोथरुड मतदारसंघात एसआरए प्रकल्प, महापालिका कामगारांचे प्रश्न आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. स्वराज्य पक्षाच्या या निर्णयामुळे अपक्ष उमेदवारांना अधिक बळ मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com