समीर वानखेडे बोगस माणूस, वर्षभरात तुरुंगात जाणार

हा नवाब मलिक तुझ्या बापाला घाबरणार नाही.
Nawab Malik-sameer wankhede
Nawab Malik-sameer wankhedeSarkarnama
Published on
Updated on

वडगाव मावळ : अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनसीबी) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नबाव मलिक यांनी आज पुन्हा एकादा हल्लाबोल केला. ‘सांगा त्या समीर वानखेडेला, तुझी नोकरी वर्षभरात जाईल. तुझा तुरुंगावास पाहिल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही. भाजपचे लोक लोकांवर दहशत निर्माण करून वसुली करत आहेत. समीर वानखेडे हा बोगस, ह्याचा बाप बोगस, ह्याच्या घरातील लोक बोगस आहेत. तुझे बाप कितीही दबाव टाकत असतील, पण हा नवाब मलिक तुझ्या बापाला घाबरणार नाही,’ अशा शब्दांत मलिक यांनी वानखेडे यांना इशारा दिला. (Sameer Wankhede bogus, he will go to jail next year : Nawab Malik)

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिरासाठी मलिक यांनी आले होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले.

Nawab Malik-sameer wankhede
राष्ट्रवादी प्रवेशाआधी नीलेश लंकेंनी अजितदादांसाठी धरला होता हट्ट!

समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहे. हा वानखेडे भाजपवाल्यांचा म्होरक्या आहे. तो बोगसगिरी करतो, त्यामुळेच एनसीबी सध्या करत असलेल्या केसेस या बोगस आहेत. ह्या सर्व केसेस कोर्टात टिकणार नाहीत. आगामी काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारे तोडपाणी हे मालदीव आणि दुबईत चालते आहे, हे आम्हाला समजलंय, ही तोडपाणी थांबण्याचे काम मी करणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपचे लोक ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आदी संस्थांच्या माध्यमातून लोकांना भीती दाखवण्याचे काम करत आहेत. पण हा नवाब मलिक कुणाच्या बापाला भिणारा नाही. फडणवीस म्हणतात की राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल, माझं तर त्यांना आव्हान आहे की, त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकावेच, असे आव्हानही मलिक यांनी फडणवीस यांना दिले.

Nawab Malik-sameer wankhede
आधी मुंडेंनी अन् आता राष्ट्रवादीनं केलं काँग्रेसला घायाळ

सध्या केंद्र सरकारची बोगसगिरी सुरु आहे. केवळ भीती निर्माण करुन बदनामी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी प्राप्तीकर विभागाने कारवाई केली. आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या घरी आठ आठ दिवस कारवाई करण्यात येत आहे, ती फक्त लोकांना घाबरवण्यासाठी केली जात आहे. पण, महाविकास आघडीचे नेते, कार्यकर्ते त्याला घाबरणार नाहीत. मोदींना हटवण्यासाठी अन भाजपला नेस्तनाबूत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून जोरदार लढाई लढू, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com