Manoj Jarange Patil : जरांगे यांना अनेक राजकीय नेत्यांचा सपोर्ट; संगीता वानखेडेंचं SIT चौकशीला समर्थन

Sangeeta Wankhede Allegations on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिली होती. आता या प्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे....
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune Politics News :

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष यांनी दिले आहेत.

जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी ही चौकशी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. यावर माझी बिंदास चौकशी करा, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मनोज जरांगे यांच्या जुन्या सहकारी संगीता वानखेडे यांनी पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुण्यामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ जरांगेंबाबत जी भूमिका घेत होते त्या भूमिकेचे मी समर्थन करते. Manoj Jarange Patil यांची एसआयटी चौकशी करावी, ही माझी पूर्वीपासूनची मागणी होती. या आंदोलनामध्ये जरांगे यांना अनेक राजकीय नेत्यांचा सपोर्ट आहे. जरांगे पाटील यांची चौकशी झाल्यावर सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं संगीता वानखेडे म्हणाल्या.

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : जरांगेंचे फक्त फडणवीसांवरच आरोप का? दानवे यांच्या प्रश्नाने भाजपची कोंडी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून जरांगे यांना मदत होत असल्याचा थेट आरोप करत वानखेडे यांनी जरांगे यांचे आंदोलन स्क्रिप्टेड असल्याचे म्हटले आहे.

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेली वक्तव्य उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे भाषण आहे. त्यांची भाषा जरांगे बोलत असल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला.

मी भाजपच्या सांगण्यावरून बोलत असल्याचा आरोप माझ्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे वेळ पडल्यास माझी देखील चौकशी करावी. परंतु जरांगे पाटील हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. समाजाला आता आरक्षण मिळाले असून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तर इतरांना सरकारने दिलेला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा सध्यातरी संपला आहे, असा दावा वानखेडे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भविष्यात हे आरक्षण टिकले नाही तर पुन्हा आंदोलनासाठी आपण उतरणार असल्याचं वानखेडे म्हणाल्या. या सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत असं समाजाला सांगून आगामी निवडणुकीमध्ये राज्यभर आपली माणसं उभी करून जरांगे पाटील यांना निवडून आणायची होती. मात्र मी त्यांचं हे बिंग फोडलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या दारामध्ये नव्या नव्या गाड्या उभ्या राहिल्या आहेत. या गाड्या कुठून आल्या याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली.

मराठा समाजातील 24,000 तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आमच्या मुलांवर गुन्हे दाखल होत, असल्याचा आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil
CM Shinde On Jarange : 'ही कुठली भाषा ? एका मर्यादेपर्यंत सहन केलं जाईल'; मुख्यमंत्री शिंदेंचा जरागेंना थेट इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com