Sangram Thopte: भाजप प्रवेशाचं संग्राम थोपटेंना मिळणार मोठे गिफ्ट; मालामाल होणार?

Sangram Thopte News Rajgad Sugar Mill Guarantee:संग्राम थोपटे यांच्याशी निगडित असलेल्या राजगड साखर कारखान्यावरत कोट्यावधींचा कर्ज आहे. त्या ठिकाणची मशिनरी देखील जुनी झाली आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात थकीत आहे. कारखाना सध्या बंद पडलेला आहे.
Sangram Thopte
Sangram ThopteSarkarnama
Published on
Updated on

Pune News: गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या मिशन बारामतीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुढची बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीमध्ये असलेले मातब्बर नेते आपल्याकडे घेतले जात आहेत.

एक प्रकारे पुणे जिल्ह्यातील आपली ताकद वाढून राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना देखील भाजपने पक्षप्रवेश दिला होता. त्यानंतर भाजपवासी झालेल्या संग्राम थोपटे यांना आता एक मोठं गिफ्ट मिळालेला असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये असताना आटापिटा करूनही जी गोष्ट हाताला लागत नव्हती ती आता भाजपात आल्यानंतर सहजरीत्या संग्राम थोपटे यांच्या पदरी पडली असल्याचे पाहायला मिळत आहे.

संग्राम थोपटे यांच्याशी निगडित राजगड सरकारी साखर कारखान्याच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जाला राज्य सरकार हमी देणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांना हा राज्य सरकारकडून मोठा दिलासा मानला जात आहे. संग्राम थोपटे यांचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत होता. अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या साखर कारखान्यामुळेच संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. हा साखर कारखाना अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही थकलं असून अखेर आज राज्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळेल माहिती समोर आली आहे. संग्राम थोपटे यांच्याशी निगडित असलेल्या राजगड साखर कारखान्यावरत कोट्यावधींचा कर्ज आहे. त्या ठिकाणची मशिनरी देखील जुनी झाली आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात थकीत आहे. या सर्व आर्थिक अडचणीमुळे हा कारखाना सध्या बंद पडलेला आहे. बँकांची कर्ज वेळेत न भरल्याने कारखान्याची निगडित असलेल्या जमिनीवर जप्ती देखील आणण्यात आली आहे.

Sangram Thopte
PMC Election 2025: जुन्या नगरसेवकांना शोधावे लागणार नवे प्रभाग ; समाविष्ट गावातून १९ नगरसेवक पुणे महापालिकेत जाणार

त्यामुळे अडचणीच्या गर्दीत सापडलेल्या या कारखान्याला पुन्हा वर काढण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज असल्याचं चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र काँग्रेसमध्ये असताना थोपटे यांनी अनेकदा कर्ज हमी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना कर्ज हमी मिळेल याचा आश्वासन देखील मिळाला होतं.

मात्र त्यानंतर कर्ज हमी त्यांना नाकारण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाशी निगडित असलेल्या कोणत्या कारखान्यालाच मदत केली जाते आणि विरोधातील कारखान्यांना डावल्याची देखील टीका त्यांनी केली होती. टिकेनंतर ते थेट भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशांमध्ये राजगड कारखान्याला आर्थिक मदत मिळावी, हा देखील एक उद्देश असल्याचं बोललं जात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com