Bala Bhegade - Amit Shaha Meeting

Bala Bhegade - Amit Shaha Meeting

Sarkarnama

बाळा भेगडे-अमित शह भेट : मावळमधील 'त्या' बाधित शेतकरी-कामगारांना न्याय मिळणार?

बाळा ऊर्फ संजय भेगडे (Sanjay Bhegade) यांनी अमित शहांची भेट घेतली.
Published on

पिंपरी : केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) हे शनिवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Visit) आहेत. काल ते शिर्डी, नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे होते. आज त्यांचा पुणे जिल्हा दौरा होता. त्यात त्यांनी मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील `एनडीआऱएफ`ला भेट दिली. ही संधी साधून मावळचे माजी आमदार आणि माजी मंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे (Sanjay Bala Bhegade) यांनी अमित शहांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी मावळातील तळेगाव दाभाडे येथील मिसाईल प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी शहा यांच्याकडे केली. बंद पडलेल्या तळेगावातीलच नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांनाही न्याय देण्यासाठी त्यांना साकडे घातले. संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन शहा यांनी दिले असल्याचे भेगडे यांनी या भेटीनंतर सांगितले.

<div class="paragraphs"><p>Bala Bhegade - Amit Shaha Meeting</p></div>
हिंम्मत असेल तर राजीनामा देऊन दोन हात करा : शहा यांचे ठाकरेंना आव्हान

शेतकरी व कामगारांचे प्रश्न मांडण्याअगोदर मा. आमदार. भेगडे यांनी शहा यांचा तुकाराम महाराजांची गाथा व पगडी देऊन स्वागत व सत्कार केला. त्यानंतर आपल्या भागातील दोन मोठे ज्वलंत प्रश्न त्यांच्या कानी घातले. साखर कारखान्यांसाठी लागणारे बॉयलर बनवणारा नॅशनल हेवी हा कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे दीड हजार कामगारांची उपासमार सुरु आहे. ही कंपनी `एनपीए`त गेल्याने तिला बॅंका कर्जही देत नाहीत. तसेच जमीनही विकता येत नाही. त्यामुळे कामगारांचे पगार थकले आहेत. ही बंद पडलेली कंपनी सुरु करावी, कामगारांना त्यांचे थकित वेतन द्यावे,अशी मागणी भेगडे यांनी शहा यांच्याकडे केली.

<div class="paragraphs"><p>Bala Bhegade - Amit Shaha Meeting</p></div>
एकटे लढणार आणि स्वबळावर येवून दाखवणार : चंद्रकांतदादांनी शिवसेनेला ललकारले

तसेच मावळातील शेलारवाडी, भेगडेवाडी आदी चार गावातील पावणेपाचशे एकर जागा संरक्षण विभागाच्या `डीआरडीओ`च्या मिसाईल प्रकल्पासाठी फक्त सव्वादोन लाख रुपये एकर भावाने घेण्यात आली आहे. त्यावेळी नंतर वाटाघाटी करू असे सांगण्यात आले होते. मात्र, त्या काही झाल्या नाहीत.

परिणामी बाधीत शेतकऱ्यांना त्यांनी मिसाईल प्रकल्पाला दिलेल्या जमिनीचा पुरेसा मोबदला मिळालेला नाही. हे किमान ४५ कोटी रुपये शेतकऱ्यांना येणं आहे. या प्रश्नातही लक्ष घालण्याची लेखी विनंती भेगडे यांनी शहा यांना केली. त्यावर संबंधित संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कॉंग्रेसचे सरकार असताना या मिसाईल प्रकल्पासाठी या जमिनी घेण्यात आलेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com