Purandar: मला आणि आमदार संजय जगताप यांना पक्ष बदलण्याची गरज नाही. आम्ही केंद्रात आणि राज्यात विरोधात आहोत. सहा महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही. याचे कारण सर्वे असावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी गुरुवारी पुरंदर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीसह अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य करतानाच केंद्र सरकारवर निशाणा साधला. सुळे म्हणाल्या, जनतेच्या मनात नसेल तर आम्ही कोठेही खडी मशीन चालू देणार नाही.पुरंदर तालुका ही संताची भूमी आहे.राज्यात मोठे योगदान असेल तर ते शिक्षकांचे आहे. सोमेश्वर कारखान्याने सर्वात चांगला भाव दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे.
गेली चार महिन्यांपासून मी सातत्याने कांद्याविषयी ठोस भूमिका घ्या, याविषयी पियुष गोयल यांना विनंती करत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांना टोमॅटोचे चार पैसे मिळू लागले. त्याचवेळी सरकारने टोमॅटो मुद्दामहून आयात केला.
कोरोनामध्ये शेतकऱ्याला लॉकडाऊन नव्हता. त्याने सर्वांना अन्न पुरवण्याचे काम केले. मेट्रोला एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा एसटीला द्यावेत. पुरंदर(Purandar)मध्ये विमानतळ झालेच पाहिजे. पण पुरंदरवासी सांगतील, त्याच जागेवर विमानतळ होईल असेही सुळे म्हणाल्या.
'' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजिबात फूट पडलेली नाही...''
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्षात अजिबात फूट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल आम्ही त्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. त्या तक्रारीवर प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रवादीत कोणताही फूट झालेली नाही. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.