Shahajibapu Patil On Thackeray: उद्धव ठाकरेंनी स्वतःला डांबून घेतल्याने त्यांच्यावर ही वेळ; शहाजीबापू पाटलांचा टोला

Shivsena News : शहाजीबापू पाटलांनी उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला.
Shahajibapu Patil and Uddhav Thackeray
Shahajibapu Patil and Uddhav ThackeraySarkarnama

Solapur News: "उद्धव ठाकरे यांनी स्वतःला डांबून घेतल्यामुळेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे", अशी खोचक टीका शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटलांनी उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊतांवरही निशाणा साधला.

शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. याबाबत बोलताना ठाकरेंनी शिंदेंबरोबर गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली. "मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना मी डांबून ठेवू शकत होतो. मात्र, जे मनाने फुटले होते, त्यांना डांबून काय करणार होतो ?", अशी टीका ठाकरेंनी केली. या टिकेवरून शहाजीबापू पाटलांनी पलटवार करत ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Shahajibapu Patil and Uddhav Thackeray
Beed NCP Sabha News : शरद पवारांचा इशारा अजितदादांनी घेतला मनावर ; बीडच्या सभेचा 'Teaser' लाँच; पण...

संजय राऊतांना यानामध्ये बसवून चंद्रावर पाठवायला पाहिजे होते, अशी खोचक टिप्पणी करत संजय राऊतांनी लोकसभा निवडणूक लढवू नये, अन्यथा राऊतांची लय आबदा होईल, असा सल्लाही आमदार पाटलांनी राऊतांना दिला.

"उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना उद्धव ठाकरे आम्हाला कुठे डांबायला निघाले आहात. तुम्ही स्वतःला डांबून घेतल्यामुळे आता तुमच्यावर ही वेळ आली", असा पलटवार आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरेंवर केला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com