Sanjog Waghere : दहावी पास वाघेरे कोट्यधीश; पण नावावर नाही एकही मोटार

Net Worth Of Sanjog Waghere : महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंकडे नाही स्वमालकीची मोटार, पण पिस्तूल आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संजोग वाघेरे यांनी त्यांचा संपत्तीचा आराखडा दिला आहे.
Sanjog Waghere Patil
Sanjog Waghere Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News: मावळ लोकसभेतील युती आणि आघाडीचे दोन्ही प्रमुख उमेदवार दहावी पास आहेत. त्यात परवा (ता.22 एप्रिलला) उमेदवारी दाखल केलेले युतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे अब्जाधीश आहेत. तर, काल (23 एप्रिल) अर्ज भरलेले आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे- पाटील हे करोडपती आहेत.

वाघेरे दाम्पत्यांकडे 18 कोटी चाळीस लाख 99 हजार 609 रुपयांची संपत्ती असून, त्यात स्थावर मालमत्ता अधिक आहे. पिंपरी-चिंचवडचे Pimpri- Chinchwad माजी महापौर तसेच राष्ट्रवादीचे NCP माजी शहराध्यक्ष असलेल्या वाघेरेंकडे एक परवानाधारी पिस्तूल आहे. मात्र, स्वतःच्या नावे मोटार नाही.

ते व त्यांची पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे (Usha Waghere) यांच्याकडे प्रत्येकी दीड लाख रुपयांची कॅश आहे. वाघेरेंकडे चार कोटी 46 लाख 36 हजार 494 रुपयांची, तर पत्नीकडे एक कोटी 89 लाख 63 हजार 115 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. दोघांकडे मिळून 12 कोटी पाच लाख रुपयांची स्थावर संपत्ती आहे. वाघेरेंवर 64 लाख 48 हजार 271 रुपये तर पत्नीवर दोन कोटी 33 लाख 84 हजार 551 रुपयांचे कर्ज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjog Waghere Patil
Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; 'या' घोटाळ्याप्रकरणी 'क्लीन चिट'

वाघेरेंनी आज उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक यावर्षी जानेवारी महिन्यातील आहेत. पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्य़ात, या मागणीसाठी त्यांनी लोणावळा रेल्वे स्टेशन येथे 12 जानेवारी रोजी रेल रोको केले होते.

लोणावळा रेल्वे पोलिस ठाण्यातील या गुन्ह्यात आरोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही. बाकीचे दोन गु्न्हे जमावबंदी आदेशाचा भंग करून केलेल्या आंदोलनाचे पिंपरी पोलिस ठाण्यातील आहेत.

त्यातील पहिली घटना ही 27 एप्रिल 2017 ची आहे. त्यात त्यांनी महावीर चौक, चिंचवड येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याबद्दल 2020 ला म्हणजे तीन वर्षांनी गुन्हा दाखल झाला, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून त्यांनी दुसरे आंदोलन हे पिंपरी चौकात 12 ऑक्टोबर 2016 ला केले.

त्यात त्यांनी महादेव जानकरांचा Mahadeo Jankar निषेध केला होता. त्यातही दोन वर्षांनंतर गुन्हा नोंदविण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांना सात-आठ वर्षे होत आली, तरी पिंपरी पोलिसांनी त्याप्रकरणी अद्याप चार्जशीट दाखल केलेले नाही.

R

Sanjog Waghere Patil
Lok Sabha Election 2024 : "वापरून घ्यायचं अन् वाऱ्यावर सोडायचं," 'या' बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसवर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com