Lok Sabha Election 2024 : "वापरून घ्यायचं अन् वाऱ्यावर सोडायचं," 'या' बंडखोर उमेदवाराचा काँग्रेसवर आरोप

Kolhapur Lok Sabha News : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारानं बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता.
Bajirao Khade
Bajirao KhadeSarkarnama

Kolhapur Political News : गेल्या 28 वर्षापासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आहे. आम्हाला उमेदवारी देऊ नका; पण किमान आमचा विचार तर करा. कामाचा आहे, तोपर्यंत काम करून घ्यायचं. काम झाल्यानंतर वाऱ्यावर सोडून द्यायचे; याचा परिणाम म्हणूनच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur Lok Sabha Constituency) काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांनी सांगितले. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खाडे (Bajirao Khade) म्हणाले, "गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस ( Congress ) पक्षाचे काम केले. त्याची दखल कोणीही घेतली नाही. सर्वसामान्यांनी निवडणूक लढवायची नाही. काँग्रेसमध्ये उमेदवारी वाटपाची जी कार्यपद्धती आहे, ती राज्यात आणि जिल्ह्यात वापरली नाही. आम्हाला उमेदवारी देऊ नका; पण किमान आमचा विचार तर करा. याचा अर्थ पक्षाला आमची किंमत नाही का? आम्हाला स्वाभिमान नाही का? त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आम्ही थांबायला तयार आहे. मात्र, कोणाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे संधी देऊ, याबद्दल काहीही चर्चा नाही. याचा अर्थ पक्षाला आमची गरज नाही. कामाचा आहे, तोपर्यंत काम करून घ्यायचं; काम झाल्यानंतर वाऱ्यावर सोडून द्यायचे हे परिणामासह आम्ही दाखवून देत आहे," असं खाडेंनी म्हटलं.

Bajirao Khade
Kolhapur Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांना अश्रू अनावर; बंडखोरी करत स्थानिक नेत्यांना दिला इशारा

"शेतकरी, बेरोजगारांसह कोल्हापुरातील आयटी पार्कचे काम करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. वीस दिवसांपूर्वीं जिल्ह्यातील नेतेमंडळी भेटली. आम्ही त्यांचा आदर करतो. पक्षात काम करूनही आम्हाला उमेदवारी मिळणार नसेल, तर आम्ही कोणाकडे बघायचे?" असा सवाल खाडे यांनी केला.

( Edited By : Akshay Sabale )

Bajirao Khade
Vinay Kore : 'जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला...' ; विनय कोरेंचं जाहीर विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com