Manoj Jarange Patil : मला त्या पापात सहभागी व्हायचं नाही, संतोष भैय्यांचं प्रकरण दाबलं जातंय! जरांगे पाटलांचा आरोप

Allegations Against CM Devendra Fadnavis : पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत विचारलं असता जरांगे पाटील यांनी आपल्या कानाला हात लावत याबाबत आपल्याला जास्त बोलायचं नसल्याचे सांगितलं.
Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis, Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आवाज उठवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता या प्रकरणामध्ये कानाला हात लावले आहेत. संतोष भैय्याचं प्रकरण दाबलं जात असून मला त्या पापात सहभागी व्हायचं नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत विचारलं असता जरांगे पाटील यांनी आपल्या कानाला हात लावत याबाबत आपल्याला जास्त बोलायचं नसल्याचे सांगितलं. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली असल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळी केला.

याबाबत अधिक बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मी प्रामाणिक आहे. उद्या जर मी मेलो तर वर जाऊन संतोष भैय्यांनी मला, हे काय केलं? असं विचारलं नाही पाहिजे. त्यामुळे मला पापात सहभागी व्हायचं नाही. हा मॅटर सरकारने पूर्णपणे संपवून टाकला आहे. या प्रकरणांमध्ये सर्वांना सहआरोपी करणं आवश्यक होतं. मात्र ते प्रकरण पूर्णपणे दाबण्यात आले आहे. कोर्टामध्ये आरोपींच्या वकिलांनी आरोपींना मकोकातून मुक्त करा, अशी मागणी केली. त्यावर सरकारी वकिलांनी देखील याला आमची काहीच हरकत नसल्याचे सांगितल्याचे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Jalinder Supekar News : कैद्यांकडून जामिनासाठी मागितले तब्बल 550 कोटी! हगवणेंचे मामा सुपेकरांवर आणखी एक गंभीर आरोप

सरकारी वकिलांनी आरोपींना मोक्यातून दोषमुक्त करण्यासाठीच्या मागणीला विरोध करणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. खंडणी मागितली गेली आणि त्यातूनच खून झाला, हे समोर असताना देखील या प्रकरणांमध्ये काहींना सहआरोपी करणं थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे या पापामध्ये मला सहभागी व्हायचं नाही. म्हणून मी त्या प्रकरणापासून दूर आहे, असं जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis, Santosh Deshmukh
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंची नाराजी कायम? मुख्यमंत्री फडणवीसांच्या तीन बैठकांना दांडी; नेमके कारण आले समोर

या प्रकरणामध्ये जितके मला प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे होते, तितके मी केले आहेत. त्यासाठी मागे हटलो नाही. मात्र आता या प्रकरणांमध्ये जर देशमुख कुटुंबाने आपल्याला सांगितलं, तरच लक्ष घालणार आहे. तसेच मकोका हटवण्याच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी आक्षेप घेतला की नाही, हे देखील आपल्याला माहीत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com