सासवड दुहेरी हत्याकांड आमदार जगतापांनी दडपलं पण कर्तबगार देशमुखांनी बाहेर काढलं

Saswad Double murder | Crime : माजी राज्यमंत्री विजय शिवतारेंचा आमदार संजय जगतापांवर गंभीर आरोप
Vijay Shivtare-Sanjay Jagtap
Vijay Shivtare-Sanjay JagtapSarkarnama

सासवड : सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरण पोलिसांवर दबाव आणून आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी दडपले होते, परंतु कर्तबगार पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) आणि हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या तत्परतेने दोन्ही हत्या प्रकरणाला वाचा फुटली, असे खळबळजनक दावा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला. तसेच सासवडचा बिहार झाला असून या प्रकरणात आमदार, त्यांचा एक सहकारी, सासवडचे काही पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासायला हवेत, तरच हत्याकांडाची पाळेमुळे शोधले जातील, असेही मत शिवतारे यांनी व्यक्त केले. (MLA Sanjay Jagtap Latest News)

तीन दिवसांपूर्वी सासवड (ता.पुरंदर) शहराच्या ताथेवाडी कट्ट्यावर उन्हातून सुरक्षिता मिळावे म्हणून विश्रांतीसाठी बसलेल्या ४ कचरा वेचकांना तिथेच अंडा बुर्जीची हातगाडी लावणाऱ्याने एका विक्रेत्याने येथे का बसला असे म्हणत मारहाण करून आणि अंगावर उकळते पाणी ओतून जखमी केले होते. दुर्देवाने यात एका 50 वर्षे वयाच्या आणि दुसऱ्या 60 वर्षे वयाच्या पुरुषाचा मृत्यू झाला होता. तर अन्य दोन जखमी व घटनेचे साक्षीदार लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम व शेवंताबाई जाधव यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

याबाबत शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना हाताशी धरून हे मृत्यू उपासमारीने झाल्याचा निष्कर्ष काढला होता. कसलाही तपास न करता पोलिस आणि डॉक्टर लोकांनी ही फाईल बंद करून टाकली होती. पण काही सुजाण लोकांनी याबाबत मला आणि पोलीस अधिक्षकांना गोपनीय माहिती दिल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. (Vijay Shivtare Latest News)

सासवड आणि जेजुरी पोलीस ठाण्याच्या कारभारात आमदार आणि त्यांचा एक सहकारी प्रचंड ढवळाढवळ करीत असून पोलिस त्यांच्या दबावाखाली निष्पाप नागरिकांना भरडून काढत आहेत. तालुक्याची स्थिती भीषण झालेली असून गरिबांना वाली उरलेला नाही. तालुक्याचा बिहार होऊ लागला आहे, असेही शिवतारे म्हणाले.

विजय शिवतारे यांचे सवाल :

  • अकस्मात मृत्यू म्हणून अगोदर नोंद करण्याची घाई का केली?

  • ३६ तास माणूस रस्त्याच्या कडेला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिका पाठविण्यास नकार का दिला?

  • शवविच्छेदन अहवालात शरीरावरील जखमांचा उल्लेख डॉक्टरने कुणाच्या दबावाखाली टाळला?

  • जेजुरीला फ्रीझर असताना मृतदेह फ्रीझरमध्ये ठेऊन त्याची ओळख का पटवण्यात आली नाही?

  • अवघ्या २४ तासात सासवड नगरपालिकेने मृतदेह जाळून का टाकला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com