Pimpri-Chinchwad News: संभाजी ब्रिगेडचे काळे पोलिसांच्या ताब्यात; झेंडावंदन होऊ न देण्याचा दिला होता इशारा

Sambhaji Bhide Vs Sambhaji Brigade: आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी करत स्वांतत्र्यदिनी झेंडावंदन होऊ न देण्याचा, इशारा संभाजी ब्रिगेडचे काळे यांनी दिला होता.
Sambhaji Brigade
Sambhaji BrigadeSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना १५ ऑगस्टपर्यंत अटक केली नाही, तर पुण्यासह राज्यातही स्वांतत्र्यदिनी झेंडावंदन होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारीच काळेंना ताब्य़ात घेतले. त्याबद्दल त्यांनी चोर सोडून सन्याशाला फाशी दिली, अशी प्रतिक्रिया देत काळेंनी पोलीस कारवाईचा निषेध केला.

महापुरुषांबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करूनही भिडेंना अटक करण्यात न आल्याच्या निषेधार्थ राजकीय पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी १० ऑगस्टला थेट पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावरच मोर्चा नेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काळेंनी वरील इशारा दिला होता. त्यामुळे वाकड पोलिसांनी काळेंविरुद्ध १५१ (३) ची प्रतिबंधक कारवाई करून काल त्यांना ताब्यात घेतले.

Sambhaji Brigade
Nawab Malik News: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची नवाब मलिकांसाठी 'फिल्डिंग'; पण मलिक घेणार 'हा' निर्णय?

मंगळवारी दुपारी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. काळेंनी व्हिडिओव्दारे १५ ऑगस्टला झेंडावंदन होऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे वाकड पोलीस ठाण्याचे सिनिअर पीआय गणेश जवादवाड यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

सोमवारी ताब्यात घेताच पोलिसांनी काळेंचा मोबाईल फोन काढून घेतला. पण, त्यापूर्वीच त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत आपल्यावरील कारवाईचा तीव्र निषेध केला होता. पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढल्याच्या रागातून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ही कारवाई केल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

Sambhaji Brigade
Ajit Pawar In Kolhapur : धडकलेल्या 'त्या' गाडीत मी नव्हतोच ! अजितदादांचा तीन दिवसांनंतर खुलासा

दरम्यान, त्यांच्या या पोस्टमुळे त्यांना वाकड पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यात अटक केल्याचा समज झाल्याने ब्रिगेडचे काही कार्यकर्ते बिथरले. त्यांनी काल पोलीस ठाण्यावर जायचे ठरवले. मात्र, स्वातंत्र्यदिनामुळे नंतर त्यांनी सबुरीची भूमिका घेतली. झेंडावंदन केल्यानंतर आज ते कोर्टात गेले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com