
Pune News : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh) यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर उरळीकांचन येथील शिंदवणे घाटामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांकडून या घटनेचा युद्धपतळीवर तपास करण्यात आला होता.आता या प्रकरणात धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर येत आहे.
पुणे पोलिसांनी (Police) या प्रकरणात या आधी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं.आता सतीश वाघ यांच्या हत्येमागचं गूढ उलगडण्यात देखील पोलिसांना मोठं यश आलं आहे.बुधवारी (ता.25) गुन्हे शाखेकडून या हत्येप्रकरणी सतीश वाघ यांच्या पत्नीलाच अटक करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून पत्नीनेच वाघ यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे व्यावसायिक होते. 9 डिसेंबरला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्यान ब्ल्यू बेरी हॉटेल समोर उभे असतानाच चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. या अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता.
याचदरम्यान, त्याचदिवशी रात्री शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. यावेळी त्यांच्या मृत देहावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचं दिसून आलं, तसंच त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी दांडके देखील आढळून आले होते.
सतीश वाघ यांच्या डोक्यावर दांडक्याच्या साह्यानेच आघात करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं.. तर मारहाण केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून गुन्हेगार पसार झाले होते. अपहरण केल्यानंतर सुरुवातीच्या काही तासातच आरोपींनी सतीश वाघ यांचा खून केल्याची शक्यता वर्तवली होती.या हत्येप्रकरणी पोलिसांची 16 पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागली होती.
पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघयांच्या खून प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरली होती. वाघ यांचा खून केल्यानंतर पोलीस सातत्याने आरोपींच्या मागावर होते. मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी सापळा रचत हत्येप्रकरणातल्या मुख्य सूत्रधाराला बेड् ठोकल्या आहेत. पोलिसांना वाघ यांचं अपहरण आणि हत्येचा छडा लावण्यात यश आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.