Pune News: विद्यार्थिनीने थेट पोलिस ठाणेच गाठले! काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, पुणे विद्यापीठात..

Pune University News: एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा. त्यामुळे संबधित विद्यार्थिनीने थेट पोलिस ठाणे गाठले, कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
savitribai phule pune university
savitribai phule pune universitySarkarnama

Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संबधीत पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना म्हणजेच नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI)संघटनेचा अध्यक्ष अक्षय कांबळे याच्याविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

savitribai phule pune university
CM Sawant ON CM Kejriwal: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला 'आयआयटीयन'आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील फरक...

एन्.एस्.यु.आयचा अध्यक्ष अक्षय कांबळे याने अनेक विद्यार्थिनींना संदेश पाठवून त्रास दिला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याने नुकतेच एका विद्यार्थिनीला केलेल्या संदेशामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा. त्यामुळे संबधित विद्यार्थिनीने थेट पोलिस ठाणे गाठले, कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चतुश्रृंगी पोलिसांनी अक्षय कांबळे यांच्यावर विनयभंग आणि विद्यार्थिनीचा छळ केल्याचे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये आता अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने (abvp)उडी घेतली आहे, संबंधित विद्यार्थ्यांवर पुणे विद्यापीठ प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभाविपने केली आहे. या प्रकरणात पुणे विद्यापीठ काय कारवाई करणार, हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com