Kerala Story News : विद्यार्थ्यांच्या मोठ्या विरोधानंतरही एफटीआयमध्ये ‘केरला स्टोरीचे स्क्रीनिंग’

पुण्यातील एफटीआयआयमध्ये आज केरला स्टोरीचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते.
Kerala Story
Kerala Story Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : बहुचर्चित केरला स्टोरीच्या स्क्रीनिंगला बहुतांश विद्यार्थ्यांचा विरोध असतानाही पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्राणी संस्थेत (FTI) केरला स्टोरीचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शवत चित्रपटाला विरोध दर्शविला. सकाळी चित्रपट सुरू होताना दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Screening of 'Kerala Story' at FTI despite massive opposition from students)

‘केरला स्टोरी’वरून गेल्या काही दिवसांपासून देशात विविध मतमतांरे व्यक्त केली जात आहे. हिंदुत्वासाठी संघटनांकडून या चित्रपटाचे उघडपणे समर्थन केले जात आहे. अनेक जण या चित्रपटाचे महिलांसाठी मोफत शो आयोजित करत आहेत. पुण्यातील (pune) एफटीआयआयमध्ये आज केरला स्टोरीचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थी संघटनांकडून त्याला विरोध दर्शविण्यात आला.

Kerala Story
Aryan Khan Case : समीर वानखेडेंची गेल्या दोन तासांपासून सीबीआयकडून चौकशी : जाताना म्हणाले ‘सत्यमेव जयते’

मागील काही दिवसांपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कारणास्तव आंदोलन चालू होते. शनिवारी सकाळीच केरला स्टोरी मुळे आंदोलनाची दिशा बदलली. एफटीआयआयमधील २०२० च्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित गुणांकन नसणे या कारणास्तव काढून टाकले होते. या विरोधात एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. (Kerala Story)

Kerala Story
Maharashtra Politic's : मलाही एकनाथ शिंदेंकडून ऑफर होती : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

उपोषणाचा पाचवा आणि आंदोलनाचा चाळीसावा दिवस चालू होता. केरला स्टोरीच्या स्क्रीनिंगलाही संघटनांनी विरोध केला असून पोलीस बंदोबस्तात स्क्रीनिंग पार पडले. पुणे शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रातील अनेकांनी चित्रपटाला उपस्थिती दर्शवली होती. स्क्रीनिंगसाठी चित्रपटाची स्टार कास्टही एफटीआयआयमध्ये आली होती.

Kerala Story
Congress Leader News : गाडीची स्मशानभूमीत पूजा...२०२३ क्रमांक अन्‌ कर्नाटकात सत्ता : काँग्रेसच्या बड्या नेत्याचा संकल्प अखेर पूर्ण

चित्रपट पाहण्याचा मला जसा अधिकार आहे. अगदी तसाच विद्यार्थ्यांनाही ‘द केरला स्टोरी’चा विरोध करण्याचा अधिकार आहे. त्यांनी चित्रपट पाहावा मग बोलावे, असे अभिनेते योगेश सोमण यांनी स्पष्ट केले. आज-काल विरोधाची ही परंपरा निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतरच विरोध करायला हवा, असे अभिनेते राहुल सोलापरकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com