Maharashtra Politic's : मलाही एकनाथ शिंदेंकडून ऑफर होती : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

मी तुरुंगात गेलो, पण तत्वाशी तडजोड केली नाही. उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलो.
Sanjay Raut- Eknath Shinde
Sanjay Raut- Eknath ShindeSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मलाही ऑफर होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (I too had an offer from Eknath Shinde: Shiv Sena leader's secret blast)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, मी शिवसेना (shivsena ठाकरे गट) पक्ष सोडून शिंदे गटाबरोबर जात नाही; म्हणून मला तुरुंगात टाकण्यात आले. मी तुरुंगात गेलो, पण तत्वाशी तडजोड केली नाही. उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलो.

Sanjay Raut- Eknath Shinde
Sameer Wankhede News : वानखेडे भाजपचे कोण लागतात? आरएसएसच्या मुख्यालयात येऊन ते कोणाला भेटले? : पटोलेंचा सवाल

मला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून ऑफर होती, हे सगळ्यांना माहिती आहे. तसे पुरावे आहेत. मी म्हटलं, माझी मान कापली तरी मी त्यांच्यासोबत जायला तयार नाही. मी शिवसेना सोडणार आणि ठाकरे परिवाराला सोडून कुठेही जाणार नाही, असे मी त्यांना ठणकावून सांगितले.

Sanjay Raut- Eknath Shinde
Pune DPC Meeting : भाजप-शिंदे गटाला किती निधी द्यायचा ते तुम्ही ठरवा; पण आमच्याही निधीचे नियोजन करा : अजितदादांसह विरोधी आमदार आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आमचे मित्रच होते ना. आम्हीसुद्धा अनेक वर्षे एकत्रच काम केले आहे ना. त्यामुळे त्याकाळामध्ये संवाद तर होताच ना. त्यामुळे मला शिंदे यांच्याकडून ऑफर होती. मात्र, मी ती नाकारली, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut- Eknath Shinde
Sharad Pawar News : पुण्याच्या डीपीसी बैठकीला शरद पवारांची हजेरी : बैठकीत कुठल्याही विषयावर भाष्य नाही

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या अकरा लोकांवर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू होत्या. कोणत्याही क्षणी जेलमध्ये जातील, अशी त्यांची अवस्था हेाती. अनेकांना वॉरंट आलेली आहेत. अनेकजण ईडीच्या कार्यालयात जाऊन बसत होते. सगळेच काही माझ्यासारखे नाहीत. ठीक आहे अटक करा म्हणून सांगणारे. हे सांगायला हिम्मत लागते. ज्या पक्षाने मला ३० ते ४० वर्षे दिले आहे, त्या पक्षाशी मी बेईमानी कशी करू, अशी भावना मनामध्ये असायला हवी होती.

Sanjay Raut- Eknath Shinde
D.K. Shivakumar News: ‘माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, हायकमांडच्या निर्णयावर समाधानी नाही’ : डीकेच्या खासदार भावाची प्रतिक्रिया

ज्या पक्षाने मला वैभव दिलं, त्या पक्षासाठी मी पाच महिने तुरुंगात गेलो, तर काय बिघडलं असतं. जेल जाना या मुख्यमंत्री होना या मिनिस्टर होना. डरपोक लोक म्हणतात, मै जेल नही जाऊंगा मैं मुख्यमंत्री बनूंगा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com