महाराष्ट्रातून देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून तुम्हाला पाहतोय साहेब..शिक्रापूरात फडणवीसांना औक्षण..!

Devendra Fadnavis : फडणवीस दिवसभर नीटसे जेवले नसल्याने त्यांनी चव्हाण यांच्याकडे तयार केलेल्या मासवडीच्या बेतावर ताव मारला.
Devendra Fadnavis Latest News
Devendra Fadnavis Latest News Sarkarnama

शिक्रापूर : 'महाराष्ट्रातून पहिले देशाचे पंतप्रधान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह आम्ही तुमच्याकडे पाहतोय. म्हणूनच भावी पंतप्रधान म्हणून आत्ता तुम्हाला ओवाळतोय साहेब...’ असे म्हणत शिक्रापूरातील चव्हाण कुटुंबीयांतील सुवासिनींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ओवाळले आणि कुठलाच प्रतिवाद न करता अगदी हसत चव्हाण परिवाराचे औक्षण त्यांनी स्विकारले. कालच्या (ता. ९ ऑगस्ट) शिरुर दौऱ्यानंतर फडणवीस रात्री साडेनऊच्या दरम्यान जेवणासाठी शिक्रापूरात थांबले होते. यावेळी त्यांच्याशी दिलखुलास चर्चाही शिक्रापूरकरांसह भाजपा (BJP) पदाधिका-यांनी केली. (Devendra Fadnavis Latest News)

Devendra Fadnavis Latest News
राठोडांच्या कुटुंबाची आम्ही माफी मागायची मग तुम्ही करुणा मुंडेंची माफी मागणार का?

साडेनऊ ते रात्री पावणे अकरा या दरम्यान फडणवीस हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहूल कुल, भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनिल कांबळे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, गणेश भेगडे आदींसह पुणे बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, राजाभाऊ मांढरे, नवनाथ सासवडे, तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, अ‍ॅड. धर्मेंद्र खांडरे, जयेश शिंदे, सुरज चव्हाण, रोहीत खैरे आदींसह सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान कालचा मंत्रीमंडळ विस्तार, शपथविधी कार्यक्रम उरकून मुंबई-पुणे-शिरुर ते शिक्रापूर असा प्रवास करुन आलेले फडणवीस दिवसभर नीटसे जेवले नसल्याने चव्हाण यांचेकडे त्यांचेसाठी तयार केलेल्या मासवडीच्या बेतावर मस्त ताव मारला. चव्हाण परिवाराचे कौतुक करताना त्यांनी पुन्हा मासवडीसाठी उभयतांना येण्याचीही ग्वाही दिली.

Devendra Fadnavis Latest News
चंद्रकांतदादांना बीजमाता राहिबाईंनी पाठविली अनोखी राखी!

दरम्यान जेवणानंतर उपस्थित पक्ष कार्यकर्ते-पदाधिका-यांनी त्यांना गेल्या अडीच वर्षातील शिरुर-हवेली मतदार संघातील सर्व शासकीय खात्यांमधील प्रशासकीय यंत्रणेबद्दलच्या तक्रारी विषद केल्या. त्यातल्या त्यात जिल्हा पोलिस दलाकडून ज्या पध्दतीने भाजपाच्या पदाधिका-यांना टार्गेट केले जात होते, त्याचाही मागोवा घेतला. सुरेश चव्हाण, नवनाथ सासवडे यांनी खोटे गुन्हे दाखल होत असल्याच्या तक्रारी केल्या तर जिल्हा पोलिस राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करीत असल्याचेही अनेकांनी यावेळी सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ मांढरे यांनी केले. दरम्यान महाराष्ट्रातून पहिले देशाचे पंतप्रधान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह आम्ही तुमचेकडे पाहतोय. म्हणूनच भावी पंतप्रधान म्हणून आत्ता तुम्हाला ओवाळतोय साहेब...’ असे म्हणून औक्षण करणा-या मंदाकीनी चव्हाण, किर्ती नलावडे, आरती रोडे, चित्रा मांढरे, विमल चव्हाण व नंदा चव्हाण या चव्हाण परिवारातील भगिनींशी फडणवीस यांनी आवर्जून पाच ते सात मिनीटे हितगुज केले.

वाबळेवाडीबाबत पूर्ण माहिती आहे.. मी पाहून घेतोय...!

यावेळी सतीश वाबळे, राजाभाऊ मांढरे यांनी वाबळेवाडी शाळेला केवळ स्व.अटलविहारी वाजपेयी यांचे नाव दिल्याने ती संघाची शाळा म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून टार्गेट केली गेली अन शाळा उध्वस्थ करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. ही माहिती सांगतानाच फडणवीस यांनी सर्वांना थांबविले अन आपल्याला या प्रकरणाची संपूर्ण माहिती असून वाबळेवाडी शाळा अन दत्तात्रय वारे गुरुजी यांचेबाबत योग्य ते न्याय देण्याबाबत मी स्वत: पाहून घेतोय, असा इशारावजाही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com